धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल - युवराज भुषणसिंह होळकर
मोहोळ (सोलापूर) - धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच पाहिजेच, पण त्याबरोबर समाजबांधवांची शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे. यासाठी सामुहीक प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन इंदोरच्या होळकर घराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत युवराज भुषणसिंह होळकर यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये धनगर समाजाचे श्रद्धास्थान व एैतिहासीक दृष्टया महत्व असणाऱ्या इंदौरच्या होळकर घराण्याच्या वारसांनीच या आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करीत धनगर समाजाप्रती आपली कर्तव्यनिष्ठा सांगितल्यामुळे भविष्यात आरक्षणाच्या आंदोलनाची धार अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे.
यावेळी मोहोळ तालुका धनगर समाजाच्या वतीने तालुकाध्यक्ष भागवत शिंदे यांनी होळकरांचा मानाचा फेटा बांधुन सत्कार करण्यात केला. यावेळी विठ्ठल कारंडे, परमेश्वर सरक, जगु गुंड, सज्जन पाटील, शामराव पाटील, शहाजी पाटील, कृष्णदेव वाघमोडे, गणेश गावडे, नामदेव नरूटे, बिरूदेव देवकते, संजय जरग, बाळासाहेब वाघमोडे, गणेश गावडे, शिवाजी पुजारी, दाजी गाढवे, भिवा कोकरे, बबन सरक गुरूजी, संजय पडवळकर, दिलिप टेकाळे, नामदेव नरूटे, सुभाष देवकर, तात्या बरकडे, मोहोन होनमाने आदीसह समाजबांधव उपस्थित होते.