चक्क कोरोना संशयितासमवेतच डोहाळ जेवण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

त्याचे उल्लंघन करून व धोकादायक कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्यासाठीची हयगईची कृती करून जीवितास धोका निर्माण होईल, असा कार्यक्रम घेतल्याप्रकरणी वसंतगड येथील तलाठी यांनी संबंधितांविरोधात फिर्याद दिली आहे.

कऱ्हाड ः "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात हयगयीची कृती करून घरात डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केल्याप्रकरणी साकुर्डी येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वसंतगड येथील तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय रघुनाथ निकम (वय 46) व सुनील रघुनाथ निकम (40 रा. साकुर्डी, ता. कऱ्हाड) यांच्यावर आपत्ती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी ः संजय निकम व सुनील निकम यांनी साकुर्डी येथील त्यांच्या घरात भाच्याच्या पत्नीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला. त्यामध्ये घरातील आठ जण, भाचा, त्याची पत्नी व तांबवे येथील कोरोना संशयित रुग्ण असे 11 लोक एकत्र केले होते. संसर्गजन्य आजार पसरवू नये म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन करू नये, लोकांना एकत्रित आणू नये याबाबत केंद्र व राज्य शासनाने आदेश दिले आहेत.

त्याचे उल्लंघन करून व धोकादायक कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्यासाठीची हयगईची कृती करून जीवितास धोका निर्माण होईल, असा कार्यक्रम घेतल्याप्रकरणी वसंतगड येथील तलाठी यांनी संबंधितांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार श्री. पानवळ तपास करत आहेत.

Video : त्या ठणठणीत अन् घरी परतल्याही; नवीन 18 संशीयत दाखल

निझरेतील पहिले आठ जण निगेटिव्ह 

कास : निझरे येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील व इतर थेट संपर्कातील आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जावळीकरांचा जीव भांड्यात पडला, तर संबंधित व्यक्तीच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 21 जणांना भणंग येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
 
पहिल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कातील 23 व्यक्‍तींचे स्वॅब सोमवारी रात्री उशिरा नेल्यामुळे त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा मंगळवारी रात्रीपर्यंत होती. हे अहवाल कसे येणार त्यावरच जावळीतील कोरोनाची व्याप्ती दृष्टिक्षेपात येणार आहे.
 
जिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध होतील, त्याप्रमाणे भणंग येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांना तेथे हलवण्यात येणार आहे. 
आज भणंग येथे दुसऱ्या दिवशीही संपूर्ण कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. सकाळी सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी गावातून पोलिस बंदोबस्तासह नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या. गावातील धान्य दळणारे गिरणवाले दळण दळण्यास तयार नसल्याने त्यांना प्रशासनाने कसेबसे तयार केले. धान्य गिरणीत रांगेतून जमा करणे, धान्य दळूण झाले, की फोन करून संबंधित दळण मालकास बोलावून धान्य देण्यात येत आहे. सार्वजनिक नळावर सामाजिक अंतर राखून पाणीपुरवठा केला जात आहे. 

अकराव्या वाढदिनाचा खर्च सियाने पाठविला पंतप्रधान निधीस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dholae Ceremony Arranged Along With Coronavirus Suspected Patient