ताकारीजवळ धूमस्टाईलने चार तोळ्यांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

ताकारी - इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर गौंडवाडी फाट्याजवळ चोरट्यांनी धूमस्टाईलने सुमारे चार तोळे सोने लंपास केले. इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी सांगितले, की महादेव विलास बाबर (तुजारपूर, ता. वाळवा) सौ. मनीषा यांच्यासह मोटारसायकल (एम एच 10 एक्‍स 4818) वरून तुजारपूरहून दुधोंडीला चालले होते. दुधोंडी श्री. बाबर यांची सासूरवाडी आहे. दुपारी एकच्या सुमारास ते गौंडवाडी फाट्यापासून ताकारीच्या दिशेने थोडे अंतर पुढे आले.

या दरम्यान, त्यांच्या मागून अचानक काळ्या रंगाच्या विना क्रमांक पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सौ. बाबर यांच्या गळ्यातील गंठण, मणीमंगळसूत्र हिसडा मारून तोडून घेतले आणि क्षणातच ते पसार झाले. हा सर्व प्रकार एवढ्या अचानक झाला, की बाबर दापंत्य काहीही करू शकले नाहीत. बाबर दांपत्याने "चोर-चोर' असा आरडाओरडा करीत सुमारे दीड किलोमीटर चोरट्यांचा पाठलाग केला. चोरटे काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून आले होते. त्या गाडीचा वेग जास्त असल्याने श्री. बाबर चोरट्यांना गाठू शकले नाहीत. ताकारीच्या कृष्णा कालव्यापर्यंत चोरटे दिसले. मात्र पुढे ते कऱ्हाड की पलूसच्या दिशेने गेले हे समजले नाही. गंठण व मणीमंगळसूत्र असे एकूण चार तोळे सोने लंपास झाल्याची माहिती श्री. व सौ. बाबर यांनी दिली. श्री. बाबर यांचे चुलत बंधू विशाल शंकर बाबर यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: dhoom style jewelry stolen