परीक्षेला डिजिटल घड्याळ वापरण्यास विद्यार्थ्यांना बंदी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

सोलापूर - सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ (पुणे) यांना फटका बसत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंडळावर दररोज काहीतरी नवीन आदेश काढण्याची वेळ येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये वेळेपूर्वी प्रवेश देणे, सहायक परीरक्षक नेमणे याबरोबरच आता विद्यार्थ्यांना डिजिटल घड्याळ घालण्यास मंडळाने बंदी केली आहे. 

बारावीच्या परीक्षेचा पेपर वॉट्‌सऍपच्या माध्यमातून फुटल्याने मंडळाची बदनामी झाली आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी मंडळाच्या वतीने रोजच नवीन आदेश काढले जात आहेत. डिजिटल घड्याळामध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे त्यातून पेपर फुटण्याची भीती मंडळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये जाताना सोबत डिजिटल घड्याळ नेण्यास मंडळाने बंदी घातली आहे. 

डिजिटल घड्याळामध्ये ब्ल्यू टूथ, कॅमेरा व कॅलक्‍युलेटर यांचा समावेश असतो. पेपर सुरू असताना अशा घड्याळामार्फत विद्यार्थी प्रश्‍नपत्रिकेचा फोटो काढून तो ब्ल्यू टूथच्या माध्यमातून बाह्य यंत्रणेकडे पाठवू शकतो. त्याने गैरप्रकार होण्याची शक्‍यता असल्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त वेळ, दिनांक, वार असलेलेच घड्याळ परीक्षा हॉलमध्ये घालण्यास परवानगी दिली आहे.

Web Title: Digital clock to use the test ban students