अबब...केवढी मोठी ही चपाती...!

मोहन काळे
सोमवार, 23 जुलै 2018

रोपळे बुद्रुक - आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या एका दिंडीत भलीमोठी चपाती बनवली जातेय. ही चपाती काही साधीसुधी नाही बरका, चांगल्या भुकेच्या चार माणसांची भूक ही चपाती भागवतेय. त्यामुळे ही चपाती यंदाच्या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  

रोपळे बुद्रुक - आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या एका दिंडीत भलीमोठी चपाती बनवली जातेय. ही चपाती काही साधीसुधी नाही बरका, चांगल्या भुकेच्या चार माणसांची भूक ही चपाती भागवतेय. त्यामुळे ही चपाती यंदाच्या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  

नांदेड जिल्ह्यातून आलेल्या अशोक महाराज पुयड यांच्या दिंडीत सध्या वारकर्यांच्या भोजनासाठी अशा प्रकारची महाकाय चपाती बनवली जात आहे. त्यांच्या दिंडीत साधारण साडेचारशे लोक आहेत. त्यामुळे इतक्‍या लोकांच्या भोजनासाठी लागणारे कष्ट व वेळ वाचवण्यासाठी या महाकाय चपातीचा वापर केला जात आहे. ही चपाती भाजण्यासाठी आचारी काम करणार्या मंडळींनी दोन फुट बाय अडीच फुट आकाराचा खास लोखंडी तवा बनवून घेतला आहे. या तव्यावर साधारण अर्धा ते पाऊन किलो वजनाच्या कणकेपासून दोन फुट व्यासाची चपाती भाजली जाते. ही चपाती तयार करण्यासाठी तीन महिलांची गरज असते.

ही जबाबदारी उमाबाई येमेवार, सत्यभामा कुंपनवार व परागबाई कोंडावार समर्थपणे पार पाडत आहेत. तींबलेल्या कणकेतील एकीने गोळे तयार करायचे दुसरीने तो गोळा लाटून द्यायचा तर तीसरीने ही चपाती तव्यावर भाजायची अशा कामांची विभागनी होते. चपाती लाटण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचे लाटणेही बनवले आहे. त्यामुळे ही चपाती अवघ्या दोनच मिनीटात तयार होते. ही चपाती जाडजूड असली तरी त्याची चव मात्र अप्रतीम असल्याचे वारकरी सांगतात. ही एक चपाती साधारण चार माणसांची भूक भागवत असल्याचे आचारी प्रल्हाद कोंडवार यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी आमच्याकडील लोक भात खात नाहीत त्यामुळे आमच्या  चार माणसांची तर तुमच्याकडील सहा माणसांची भूक भागवणारी ही चपाती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: dindi chapati aashadhi wari pandharpur