भारत भालकेंच्या राजीनाम्याची मंगळवेगढ्यात चर्चा

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 27 जुलै 2018

मंगळवेढा - राज्यात मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षाचा निषेध करत आरक्षण तातडीने द्यावे या मागणीचा जोर वाढला. दरम्यान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ. भारत भालके यांनीही यात उडी घेत राजीनामा दिला आहे. परंतु, याच राजीनाम्यावरून सोशलमिडीयातील आजी माजी स्वीय सहायकात पोस्ट टाकण्यावरून कलगीतुरा रंगला. याचीही शहरात चांगलीच चर्चा होवू लागली.

आरक्षणावरून शांतता मोर्चा काढूनही सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली याचे जास्त पडसाद मंगळवेढ्यात उमटले. विजारीच्या दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आंदोलकानी रोखून धरले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी पंढरपूर दौराही सुरक्षतेच्या कारणावरून रद्द केला. काकासाहेब शिंदेच्या आत्महत्येनंतर या समाजाच्या भावना आणखी तीव्र झाल्या. सोशलमिडीयावरही आमदारांनी राजीनामा द्यावा याची मागणीचा जोर धरण्यात आला. 

दरम्यान, मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत व महादेव कोळी समाजाच्या दाखल्यावरून भारत भालकेंनी राजीनामा दिला. याबाबत पत्र प्रसिद्ध झाले. परंतु, शुक्रवार जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्री राम मंगल कार्यालय इसबावी, पंढरपूर येथे महत्वाच्या विषयाबाबत मिटिंग आयोजित केल्याची पोस्ट सोशलमिडीयात विद्यमान आ.भालकेचे सहायक रावसाहेब फटे यांनी शेअर केली. तर यापुर्वी माजी सहायक असलेले पांडुरंग जावळे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेशी खेळले जात आहे. विधानसभा सदस्याचा राजीनामा द्यायचाच असेल तर आमदार महोदयसाहेबानी सन्मानीय सभापतीच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहून, 
सभापतीच्याकडे मिळणारा फॉर्म भरून द्वाया तसेच त्यांच्या समोर प्रत्यक्ष सही करूनकरावी लागते. त्याचवेळी राजीनामा दिल्याचे गृहीत धरला जातो.

Web Title: The discussion of the Bharat Bhalaks resignation