पोर्टलवरील चुकीमुळे विम्याच्या लाभ भविष्यात मिळण्याबाबत साशंकता

farmer1.jpg
farmer1.jpg

मंगळवेढा : दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांला गोलमाल करण्याचे प्रयत्न शासन आणि विमा कंपनीकडून सुरु आहेत. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील नंदेश्‍वर गावाचा समावेश करण्यात आला आहे. बोराळे महसूल मंडळाकडून नंदेश्‍वरमधील विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचा महसूल बदलून थट्टा करण्याचा प्रताप करण्यात आला. पोर्टलवरील चुकीमुळे विम्याच्या लाभ भविष्यात मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की शासनाने प्रधानमंत्री 'फसल बीमा' योजनेतील खरीप पिकाच्या विम्याची माहिती ऑनलाईन झाल्याशिवाय भरपाई मिळणार नसल्याच्या सुचना यापुर्वीच दिल्या. पण खरीप हंगामातील पिकाच्या विम्याची जबाबदारी ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आली. तालुक्यातील नंदेश्‍वर गावाचा समावेश आंधळगाव महसूल मंडळामध्ये होतो. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळावर मात्र नंदेश्‍वर गाव बोराळे महसूल मंडळांमध्ये दिसू लागल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले.

दोन दिवसात या गावातील विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाने घेरल्यामुळे निसर्गाच्या कृपेने हातात येईल त्यावर समाधान मानणाऱ्या शेतकऱ्यांला पिक विम्याचा मोठा आधार असल्यामुळे शेतकऱ्यांची पिक विमा भरण्यासाठी पळापळ सुरु झाली. गतवर्षीच हीच माहिती ऑनलाईन करताना नाकीनऊ आले होते. त्यामुळे त्यातच ऑनलाईन नोंदणी संथ गतीने होत असल्यामुळे बॅक कर्मचारी व सीएससी सेंटरचालक चालक ही चांगलेच धास्तावले आहेत. डाळींब पिक विमा भरण्यापासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहिले. पण आता खरीप हंगामापासून ते वंचित राहू नये आणि ऑनलाईन पध्दतीमुळे शेतकरी ताठकळत आहे. त्यातच महसूलही बदलला आहे.  या सर्वामुळे भागातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का ?  असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

''सदराचे पोर्टल केंद्र शासनाच्या आखत्यारित असून त्यामध्ये बदल करणे हे आमच्या हातात नाही तरीही यातील दुरूस्तीबाबत कळविण्यात येईल.''
- बसवराज करपे, वरिष्ठ मंडळ प्रबंधक ओरीएंटल इन्सुरन्स कंपनी.

 ''गतवर्षी विमा भरून कंपनीने लावलेल्यामुळे पात्र असताना वंचित राहण्याची वेळ आली यंदाही पाऊस नुसता हुलकावणी देत विमा भरून वंचित राहण्याची वेळ शासन आणि विमा कंपनीमुळे येणार याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.''
- आबासाहेब पाटील शेतकरी नंदेश्वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com