बेकायदा फलक हटविताना वादावादी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कोल्हापूर : शहरात विविध दुकानांच्या बाहेर लावले जाणारे मोठ्या कंपन्यांचे डिजिटल फलक बेकायदेशीर असल्याने महापालिकेने आजपासून हे फलक हटविण्याची कारवाई सुरू केली. मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईड या इमारतीवरचा एका मोबाईल कंपनीचा फलक काढताना दुकानदाराचे शटरही निघाल्याने दुकानदार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. 

दुकानदारांनी जेसीबी रोखून धरल्यानंतर बराच वेळ हा वाद सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर वाद निवळला. यामुळे काही काळ मिरजकर तिकटी येथे वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

सकाळी अकराच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईडच्या येथे एका मोबाईल शॉपीचा फलक हटविण्याचे काम महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. या वेळी फलक काढताना दुकानाचे शटरही निघाले. यावरून दुकानदाराने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली. हा वाद वाढत गेला. दुकानदाराने महापालिकेचा जेसीबी रोखला. यावरून जोरदार खडाजंगी झाली. शटरचे नुकसान महापालिकेने भरून द्यावे, अशी दुकानदाराने मागणी केली. बेकायदेशीर फलक लावणाऱ्या कंपनीकडूनच ही नुकसानभरपाई घ्या, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. हा वाद वाढत गेला. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच पोलिस आले. त्यांनी समजूत काढत हा वाद मिटविला. मोबाईल कंपनीचे प्रतिनिधीही तेथे आले. महापालिका अधिकारी आणि मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. 

फलक हटाओ सुरूच राहणार 
शहरात दुकानांच्या बाहेर जे विविध कंपन्यांचे फलक लावले जातात त्याचेही शुल्क आकारण्याचा ठराव महापालिकेत झाला आहे; पण या कंपन्या याबाबत टाळाटाळ करतात. याची जबाबदारी ना दुकानदार घ्यायला तयार आहेत, ना मोबाईल कंपन्यांसह विविध कंपन्या. त्यामुळे इस्टेट विभागाने वारंवार सांगून, मुदत देऊनही या फलकांचे शुल्क भरायला कोणीही तयार नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आजपासून कारवाईला सुरवात केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute when Removing Illegal boards