मोफत दूध वाटून सरकारचा निषेध   

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्विकारले. दूध दरवाढीबाबत राज्य सरकार वेळकाढू भूमिका घेत आहे, असा आरोप किसान सभेकडून राज्यभर केला जात आहे.

सांगली - म्हैस आणि गायीच्या दूध दरात राज्य सरकारकडून वाढ करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आज किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. लोकांना मोफत दूध वाटून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. 

उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्विकारले. दूध दरवाढीबाबत राज्य सरकार वेळकाढू भूमिका घेत आहे, असा आरोप किसान सभेकडून राज्यभर केला जात आहे. एक जूनपासून राज्यात दूध रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर इशारा म्हणून मोफत दूध वाटपाचे आंदोलन झाले. 

जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, "दूध खरेदी करणारे तब्बल 400 टक्के नफा कमावतात. शेतकऱ्यांना कमी पैशात दूध विकावे लागते. दुहेरी नफा कमावणाऱ्या बड्यांच्या पाठीशी सरकार आहे. दूध फुकट न्या, असा इशारा दिला. सरकार मात्र हलायला तयार नाही. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. दूधात लिटरमागे रोज 10 रुपयांपेक्षा जास्त तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल.''  

दिगंबर कांबळे, गवस शिरोळकर, डॉ. सुदर्शन गिर्डे, गुलाब मुलाणी, अॅड. सुधीर गावडे, रिहाना शेख, माधुरी देशमुख, जोहरा नदाफ, बाळासाहेब गुरव आदी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: By Distributing Milk Protested Against Government