कॅशलेससाठी जिल्हा बॅंक सुविधा देणार - आमदार मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

५६ एटीएम मशीन सुरू करणार, रुपे कार्डचेही वाटप 
कोल्हापूर - चलन टंचाईमुळे बॅंकेच्या ठेवीदार, ग्राहक, खातेदार तसेच कर्जदारांची अडचण होऊ नये, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे बॅंकेचे व्यवहार कॅशलेश होण्यासाठी सर्व सुविधा पुरवणार असून, शेतकरी, पेन्शनधारक, महिला बचत गटांना कॅशलेश व्यवहारासाठी सज्ञान करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा बॅंकेत आज संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. 

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘चलन टंचाईने लोकांना हैराण केले आहे. यामुळे जिल्हा बॅंकेची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकांना जाण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेच्या खातेदारांनाही ऑनलाइन व कॅशलेस सेवेचा लाभ घेता यावा यासाठी जास्तीत जास्ती खातेदारांना रुपे कार्ड वाटप केले जाणार आहे.

सध्या जिल्हा बॅंकेचे १५ लाख खातेदार आहेत. यांपैकी अडीच लाख खातेदार कर्जदार आहेत. नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकऱ्यांना आता ई. एम. व्ही. चीप कार्ड दिले जाणार आहे. आजअखेर २० हजार कार्डांचे वितरण केले आहे. चलनाशिवाय शेतकऱ्यांची व जिल्हा बॅंकेच्या ग्राहकांची कोंडी झाली आहे. 

आर.टी.जी.एस, एन, ई. एफ.टी व सी.टी.एस क्‍लिअरिंगद्वारे आपले चलन करता येतील. याशिवाय जिल्हाभर शाखांचे जाळे विचारात घेता बॅंकेने अद्ययावत दोन ई लॉबीसह स्वतःची ५६ एटीएम सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ३६ एटीएम व २० रिसायकलरर्स मशीन बसविली आहेत. म्हणजे एकाचवेळी पैसे काढता आणि भरता येतील. जिल्हा बॅंकांना चलन टंचाइसाठी आवश्‍यक रक्कम उपलब्ध करून देण्याची ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.’’ 

तसेच, ५०० व १००० रुपयांच्या जिल्हा बॅंकेने स्वीकारलेल्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने घेण्याबाबत सुनावणी होऊन बॅंकांना दिलास मिळेल, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले. त्यासाठी ग्राहक, खातेदार व कर्जदारांनी या नवीन बदलाचे स्वागत करावे तसेच, बॅंकेलाही थोडा वेळ देण्याचे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.  

व्यापाऱ्यांसाठी पॉज मशीन
ज्या गावात बॅंकेची शाखा नाही अशा ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी विकास संस्था, दूध संस्थांच्या ठिकाणी मायक्रो एटीएमची सुविधा दिली जाणार आहे. ज्याद्वारे बॅंकेत न जाता ग्राहकांना पैसे काढण्याची किंवा भरण्याची सुविधा मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या ठिकाणी पॉज मशीन बसविले जाणार आहेत. यातून ग्राहकांना कार्डद्वारे कॅशलेस खरेदी करता येईल. लवकरच बॅंकेच्या रुपे कार्डद्वारे ऑनलाईन खरेदी करण्याची सोय उपलब्ध होईल.

Web Title: District Bank will facilitate cashless