
पंढरपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज माफी योजनेला गती आली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि राष्ट्रीय बॅंकांचा समावेश केला आहे. पंढरपूर तालुक्यात . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सुमारे 8 हजार 887 थकबाकीदारांची संख्या आहे. या थकीत शेतकर्यांना सुमारे 81 कोटी 46 लाख रुपयांची कर्ज माफी मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने शेतकर्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात महाविकास आडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणार्या शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले आहे.
त्यानुसार शासन पातळीवर या कर्ज माफी योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि राष्ट्रीयकृत बॅंकेच्या थकबाकीदार शेतकर्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे ही वाचा... सिद्धेश्वर मंदिरात साकारणार दगडी सभामंडप
त्यानुसार पंढरपूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाने तालुक्यातील थकबाकीदार शेतकर्यांचे संख्या आणि त्यांच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती शासनला पाठवली आहे. त्यानुसार तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे 8 हजार 907 थकबाकीदार शेतकर्यांना संख्या आहे. या शेतकर्यांकडे 81 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकीची रक्कम आहे.
हे ही वाचा... खासदार डाॅ. महास्वामींना का आली भोवळ
कर्जमाफी .योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत शेतकर्यांना आधार कार्डचा नंबर द्यावा लागणार आहे. आता पर्यंत सुमारे 8 हजार 887 खातेदारांनी आपले आधार नंबर बॅंकेत जमा केले आहेत .उर्वरित 29 खातेदारांचा आधार नंबर जोडण्याचे काम सुरु आहे.
लवकर शेतकर्यांच्या खात्यावर थकबाकीची रक्कम होईल असेही निंबधक कार्यालायच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
लवकरच खात्यावर रक्कम
शासनाच्या कर्जमाफी योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे 8 हजार 907 थकबाकीदारांना लाभ होणार आहे. यासाठी 81 कोटी 46 लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
- एस.एम. तांदळे, सहाय्यक निंबधक सहकारी संस्था , पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.