जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर

दिवाळीनंतर मतदान : २२१९ संस्था सभासद व ३५४ वैयक्तिक मतदार
SANGLI
SANGLISAKAL

सांगली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. अंतिम मतदार यादीत २२१९ संस्था सभासद तर ३५४ वैयक्तिक मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादी इतकीच मतदार संख्या अंतिम यादीत आहे. आता बँकेचा निवडणूक कार्यक्रम दहा दिवसात लागून आचारसंहिता लागू होईल. दिवाळीनंतर मतदान होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांबरोबर जिल्हा बँकेची निवडणूकही लांबणीवर गेली होती. संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. त्यानंतर सव्वा वर्षाहून अधिक काळ संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. गत महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जिल्हा बँकांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला.

जिल्हा बॅँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यावर १९ हरकती दाखल झाल्या होत्या. हरकतींवर कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधकांसमोर सुनावणी झाली. सर्व हरकतींवर सुनावणी होऊन आज बँकेची अंतिम मतदार यांनी प्रसिध्द करण्यात आली. अंतिम यादीत २२१९ संस्था सभासद तर ३५४ वैयक्तिक मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादी इतकीच अंतिम मतदारांची संख्या आहे. प्रारूप यादीत जत येथील उंटवाडी विकास सोसायटीला अपात्र ठरवले होते. परंतू सांगली जिल्हा बिजोत्पादक सहकारी संस्थेला पात्र ठरवले. त्यामुळे मतदार संख्या पूर्वीइतकीच राहिली आहे.

अंतिम यादी जाहीर झाल्यामुळे आता दहा दिवसानंतर आणि पंधरा दिवसाच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. निवडणूक कार्यक्रम ४५ दिवसांचा असतो. ऑक्टोबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होईल. प्रत्यक्ष मतदान दिवाळीनंतर होणार आहे. त्यापूर्वी दसरा व दिवाळीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग येईल. बुधवारी (ता.२९) बँकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेनंतर बँकेच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्षातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com