जिल्हा रुग्णालयात आता "केमो थेरपी' 

जिल्हा रुग्णालयात आता "केमो थेरपी' 

सातारा - कर्करोगाच्या उपचारातील केमो थेरपीसाठी आवश्‍यक असलेली औषधे जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध झाली आहेत. ही औषधे प्रमाणित करून घेण्याची प्रक्रिया केली जात आहे.  त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लवकरच केमो थेरपीची सुविधा सुरू होणार आहे. 

कर्करोगाच्या आजारावर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये सुविधा नव्हती. त्यामुळे नागरिकांना पूर्णत: खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते, तसेच बहुतांश ठिकाणी जिल्ह्याबाहेर उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची ही परवड दूर करण्यासाठी शासनाने सर्व जिल्हा रुग्णालयात कर्करोग उपचारातील महत्त्वाची ठरणाऱ्या केमो थेरपीची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा, पुणे, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, जळगाव, अकोला, नागपूर या दहा ठिकाणी प्रायोगित तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार होती. 

हा विभाग सुरू करण्यासाठी शासनाकडून औषधे उपलब्ध होत नसल्याने काही काळ या विभागाचे  कामकाज रेंगाळले होते; परंतु ही औषधे टाटा संस्थेकडून घेण्यास मुभा देण्यात आली होती. ती औषधे उपलब्ध झाली आहेत. ती प्रमाणित करण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये केमो थेरपीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र चार बेडचा विभाग तयार करण्यात आला आहे, तसेच वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफही नियुक्त करण्यात आला आहे. औषधांचे प्रमाणिकरण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्षात केमो थेरपीला सुरवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना केमो थेरपीचा उपचार परडणारा होणार आहे. 

""केमो थेरपीसाठी औषधे उपलब्ध होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता. आता औषधे मिळाली आहेत. त्याचे प्रमाणिकरण झाल्यानंतर लवकरच जिल्हा रुग्णालयात केमो थेरपीला सुरवात होईल. सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.'' 
- डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com