जिल्हा नियोजन समितीवर  वंचितांचा होणार विचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

सांगली - झेडपी, नगरपलिका, नगरपरिषदांच्या रणधुमाळीनंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. झेडपी सदस्यांमधून नियोजनवर २४ सदस्य निवडले जात होते. यंदा नगरपालिका, नगरपंचायतींची संख्या वाढल्याने ही संख्या २३ वर येण्याची शक्‍यता आहे. नियोजन  समितीत झेडपी, महानगरपालिका, नगरपलिकांमधून ३२ सदस्य निवडले जातात. इस्लामपूर, पलूस, आष्टा, कडेगाव, खानापूर, विटा, तासगाव, कवठेमहांकाळ नगरपालिका व नगरपंचायतींची निवडणूक झाली.  नियोजन समितीवर नूतन झेडपी सदस्य, नगरसेवकांतून २७ प्रतिनिधी निवडले जातील. 

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतून पाच, झेडपीतून २४, नगरपालिकांमधून तीन नगरसेवक समितीवर निवडले जातात. पलूस, कडेगाव, खानापूर, जत, कवठेमहांकाळ नगरपालिकांची निर्मिती झाली. शिराळ्यातही नगरपंचायत झाली आहे. सहा तालुकास्तरीय ग्रामपंचायतीच्या नगरपालिका, नगरपंचायती झाल्या. समितीवर २४ सदस्य जात यंदा त्यात एक, दोनने संख्या कमी होईल. 

डावलेले जिल्हा नियोजनवर 
जिल्हा नियोजन विभागाने निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. शासनाकडून मार्गदर्शन आल्यानंतर तातडीने निवडणुकीच्या हालचालींना वेग येईल. 

भरीव निधीमुळे सदस्यांना लागले वेध
नियोजन समितीचा सन २०१६-१७ चा वार्षिक आराखडा २१२.३५ कोटींचा आहे. झेडपी स्वीय निधीच्या अनेकपटीने आराखडा मोठा आहे. यामुळे झेडपीतून नियोजनवर जाण्यात सदस्यांना रस आहे. सदस्यत्व मिळाले तर मतदारसंघात विकासासाठी भरीव कामे करता येतात.  

Web Title: District Planning Committee will consider convertible