

सांगली : निरक्षरतेचा शिक्का पुसण्यासाठी जिल्ह्यातील १६ हजार ५६० जणांनी आज शासनाकडून ‘उल्लास’ नव भारत साक्षरता अभियानांतर्गत परीक्षा दिली. दोन हजार २५ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात १५ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी-आजोबांनीही यावेळी उत्साहाने सहभाग घेतला.