खेड शिवापूर,आनेवाडी टाेल माफ करा ; वाहतुकदारांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

तासवडे व किणी टोलनाका टोल `फ्री` केला आहे. त्याच पद्धतीने खेड शिवापूर व आनेवाडी टाेलनाकाबाबत निर्णय व्हावा. 

सातारा ः पूरपरिस्थितीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो माल वाहतूकदार पुणे ते कोल्हापूर या मार्गावर थांबविण्यात आले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित येतात. या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली 15 दिवस स्थगित ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवाशी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 
त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात आम्ही केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेले तासवडे व किणी टोलनाका येथील टोल वसुली तात्पुरती थांबविली आहे.वाहनधारकांवर अस्मानी संकट ओढवलेले आहे. तरी पुणे ते बंगळूर या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत खेड शिवापूर व आनेवाडी या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्‍यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadi