कोल्हापूर: डॉक्टरने छापल्या नकली नोटा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कोल्हापूर : नोटा स्कॅनिंग करून खपविणाऱ्या डाॅक्टरला आज (शुक्रवार)अटक करत त्याच्याकढून सतरा हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या. सुधीर रावसाहेब कुंबळे ( वय 33 ) रा. एव्हरग्रीन पार्क, नागाळा पार्क असे या डॉक्टरचे नाव आहे. 

कोल्हापूर : नोटा स्कॅनिंग करून खपविणाऱ्या डाॅक्टरला आज (शुक्रवार)अटक करत त्याच्याकढून सतरा हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या. सुधीर रावसाहेब कुंबळे ( वय 33 ) रा. एव्हरग्रीन पार्क, नागाळा पार्क असे या डॉक्टरचे नाव आहे. 

मिळालेली माहिती अशी कि, सुधीर याने दवाखान्यामधेच अत्याधुनिक पद्धतीचे स्कॅनर, प्रिंटर, कटर आणि एक्सल बॉण्ड कागद यांच्या साहाय्याने खोट्या नोटा बनवण्याचा व्यवसाय सुरु केला होता. देशातील सद्यस्थिती पाहता चलनी नोटांचा तुटवडा असल्यामुळे सध्या या नोटा हातोहात खपल्या जात होत्या. २ हजारांची नवीन नोट महिन्याभरापूर्वीच बाजारामध्ये दाखल झाली आहे तसेच अजूनही ही नोट अनेकांच्या खिशांपासून लांबच असल्यामुळे  नोट अधिक प्रमाणात छापली जात होती. नकली नोट आहे हे समजू नये, यासाठी किरकोळ विक्रेत्यांना ह्या नोटा दिल्या जात असत.  बाजारपेठेतील मंदी, चलनाचा तुटवडा यामुळे हे विक्रेते कुंबळेचे "सॉफ्ट टारगेट' होते. अश्याच एका चप्पल विक्रेत्याकडे खरेदी साठी दोन हजारांची नोट खपवण्याचा प्रयत्न करत असताना हा डॉक्टर जाळ्यात अडकला. या विक्रेत्याच्या प्रसंगावधानामुळे आणि निरीक्षणामुळे नोट खोटी असल्याचे लक्षात आले.

कुंबळे याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून खोट्या नोटा छपाईचे साहित्य जप्त केले आहे. याच बरोबर २०, १००, २००० रुपयांच्या एकूण १७ हजार रुपये किमतीच्या नोटा देखील जप्त केल्या आहेत.

Web Title: doctor forged currency notes, arrested in Kolhapur