डॉक्‍टरांची अनुपस्थिती १२ महिने १८ काळ..!

प्रवीण जाधव
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सायंकाळच्या ‘ओपीडी’त दिला जातो सकाळी येण्याचा सल्ला; वरिष्ठही असतात अनभिज्ञ

सातारा - बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हा जिल्हा रुग्णालयातील बऱ्याच दिवसांपासून ऐरणीवर आलेला मुद्दा आहे. सायंकाळच्या ‘ओपीडी’ला तर, पाय लावण्यापुरतेच अनेक जण येतात. अनेकांची उठबस ‘कॅन्टीन’मध्येच जास्त असते. रुग्णालय प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

विविध समस्यांनी घेरलेल्या जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती हा गंभीर मुद्दा बनला आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये येत असतात. बाह्यरुग्ण विभागातील तपासणीवरच त्यांच्या पुढील उपचाराची दिशा ठरत असते.

मात्र, बहुतांश वैद्यकीय अधिकारी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण वेळ बाह्यरुग्ण विभागात हजर नसतात. वेळेवर न येणे, त्यानंतरही आपल्या कक्षात जास्त काळ थांबत नाहीत. कॅन्टीनच्या फेऱ्यांमध्येच अनेकांचा बराच वेळ जातो. त्यामुळे रुग्णाला शिकाऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात यायची गरज काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. वेळेत सल्ला न मिळाल्याने पुढील चाचण्या करून रुग्णाला औषधे घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात.

पूर्वी केवळ सकाळीच बाह्यरुग्ण सुरू असायचा. मात्र, रुग्णांच्या कामाच्या वेळा व त्यांची गरज लक्षात घेऊन शासनाने सायंकाळी चार ते सहा या वेळेतही बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातही 
पान २ वर 
 
चुकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
वरिष्ठांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या नादात कामचुकारांवर कारवाईही होत नाही. हा प्रकार तातडीने थांबला पाहिजे. चुकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली पाहिजे. तरच, रुग्णांना योग्य उपचार मिळू शकतील.

Web Title: Doctor's absence from 12 months to 18 hours ..!