लॅब्रोडरने गाजविला पहिला दिवस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

कॅनाईन डॉग शोमध्ये २० श्‍वानांचे सादरीकरण; हनुमंत आर्जा यांचे श्‍वान प्रथम

कोल्हापूर - श्‍वानाला प्रशिक्षण दिले, की दिलेली अज्ञा तो क्षणात पाळतो, याची प्रचिती कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरच्या डॉग शोमध्ये सहभागी श्‍वानांनी दिली. पहिल्याच दिवशी लॅब्रोडर जातीच्या श्‍वानांनी पहिला दिवस गाजविला. सी ६ व सी ७ या दोन्ही गटांत हनुमंत अर्जा यांच्या साडेचार वर्षांच्या श्‍वानाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रवीण हैदराबादकर यांच्या बिगेल मेल या साडेचार वर्षीय श्‍वानाने द्वितीय क्रमांक पटकावला. 
सी ७ गटात शिरीष परब यांच्या लॅब्रोडर जातीच्या श्‍वानाने द्वितीय क्रमांक पटकावला.   

शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर दोनदिवसीय कॅनाईन डॉग शोला आज सुरवात झाली. पहिल्या दिवशी डॉबरमन, गोल्डन रिट्रिव्हर, लॅब्रोडर, रॉटबेलर, बिगेल, बेल्जियम शेर्फड, मिनिचेअर फिन्शर या डॉगचा विशेष फेरीत सहभाग घेतला. पहिल्या दिवशी आज्ञाधारक श्‍वान (ओबोडियन) या वर्गातही स्पर्धा झाली. प्रत्येक श्‍वानासोबत हॅण्डलर मैदानात आले. तेव्हा मॉन्टी गो... मॉन्टी वेट, मॉन्टी राऊंड अशा हॅण्डेलरने दिलेल्या सूचना प्रत्येक श्‍वान लयदार गती घेऊन चालला, थांबला, बसला. उभाही राहिला. डावीकडून उजवीकडे वळला. अशी एकाहून एक सरस प्रात्यक्षिक सादर करत हॅण्डलरला प्रतिसाद दिला. सूचनांचे पालन काही काही सेकंदात करत प्रत्येक श्‍वानाने उत्तम शारीरिक, बौद्धिक चाणक्ष पणाची साक्ष दिली. वीस पावले चालण्याच्या सूचना हॅण्डलरने देताच त्याचे पालन करत श्‍वान डौलात चालले. लेप्ट राऊंड किंवा राइट राऊंड म्हटले, की श्‍वान डावीकडे-उजवीकडे वळायचे. जंप म्हटले की झेप घ्यायचे, अशी दहा प्रात्यक्षिक प्रत्येक श्‍वानाला करावी लागली. असे या फेरीचे स्वरूप होते. त्यानुसार पांढऱ्या, तपकरी, काळ्या रंगाचे काही केसाळ तर काही केशविरहीत श्‍वान या फेरीत 
दाखल झाले.

स्पर्धेतील प्रत्येक फेरीत बहुतेक श्‍वानाला इंग्रजीत सुचना किंवा केवळ हातापायांच्या इशाऱ्यावर सुचना मिळत होत्या. त्याचे बहुतेक श्‍वानांनी तंतोतंत पालन केले. 

त्यानंतर श्‍वानाचे वय, वजन, उंची व त्याने केलेल्या सादरीकरणात हॅंडलरला दिलेला प्रतिसाद यावर गुण मिळविले.

आजच्या शोला ४०० डॉग  
कॅनाईन क्‍लब डॉग शोचा उद्या (ता. १८) दुसऱ्या दिवशी देशभरातील ४०० हून अधिक श्‍वान सहभागी होणार आहेत. यात दरवर्षीप्रमाणे लॅब्रोडर व विविध प्रकारचे हाऊंट, फिन्शर , डॉबरमॅन अशा काही महत्त्वाच्या जातींचे श्‍वान तसेच काही दुर्मिळ जातींचे श्‍वान पाहण्याची संधी करवीरकरांना आहे.

Web Title: dog show in kolhapur