योग केल्याने देशाचे स्वास्थ चांगले राहील - बाबा रामदेव

राजशेखर चौधरी
रविवार, 18 मार्च 2018

विवेकानंद प्रतिष्ठान आणि पतंजलि योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग्य व चिकित्सा शिबिराच्या दुसऱ्या दिवशी आपले विचार व्यक्त करीत होते.

अक्कलकोट - भारत देश 2050 सालापर्यंत आर्थिक व आध्यात्मिक महासत्ता बनायचे असल्याने आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. त्यातून योग आणि प्राणायाम यांच्या माध्यमातून आपले शरीर स्वास्थ चांगले ठेऊ यात, कारण असे करण्याने देशाचे स्वास्थ सुद्धा चांगले राहणार आहे, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले.

विवेकानंद प्रतिष्ठान आणि पतंजलि योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग्य व चिकित्सा शिबिराच्या दुसऱ्या दिवशी आपले विचार व्यक्त करीत होते. प्रारंभी आजच्या शिबिराची सुरवात यशपालजी आर्य, स्नेहलता आर्य, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, रत्नप्रभा माळी, आयोजक सचिन कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी, घनीलालजी यादव, गोविंद गाडगिळ, श्रीधर दिवेकर, सुनील क्षीरसागर, श्रीराम लाखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 
दीपप्रज्वलनाने करण्यात आली. योगाचे अनेक प्रकार उपस्थितांना शिकवातच रामदेवबाबांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की सर्वांनी जातीभेद नष्ट करावा आणि कुणीही दुर्बुद्धीने वागू नये ज्याने स्वतःची आणि देशाची हानी होईल.प्रत्येकांनी योग अवश्य करावा ज्याने तो स्वतः श्रेष्ठ बनेल. आपण सर्वदृष्टीने समृद्ध आणि परिपूर्ण असणे सध्याच्या काळात गरजेचे आहे. प्रत्येकांनी शुभकामना ठेवावे आणि त्यासाठी योग अभ्यास करावा आणि प्राचीन काळातील ऋषी मुनींनी आपल्यासाठी ठेवलेला अनमोल ठेवा आपण वापरून आपले जीवन मंगलमय बनवू यात. तसेच आपले काम हेच धर्म, पूजा आणि आपली भारतमातेचे सेवा असल्याचे स्पष्ट केले.आज दुसऱ्या दिवशी फत्तेसिंह मैदान हे गुढीपाडवा सण असूनही महिला आणि शाळकरी मुले यांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेलेला दिसला. आज शिबीर संपल्यानंतर स्वामी रामदेवबाबा यांच्या हस्ते पूजन करून गुढी उभा करण्यात आला. उद्या दि. 19 ला योग शिबिराचा पहाटे पाच ते साडेसात या वेळेतला शेवटचा दिवस आहे. वंदेमातरम ने आजच्या शिबिराची सांगता करण्यात आली.

Web Title: By doing yoga the countrys health will be good baba ramdev