गडचिरोलीच काय, घरी पण जाईन; पोलिस अधिकाऱ्याचे आमदाराला उत्तर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली. त्यामुळे भडकलेल्या नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र या धमकीला न घाबरता गुरव यांनी, 'गडचिरोलीच काय पण घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,' अशा शब्दात प्रतिआव्हान दिल्याने महापालिकेच्या बाहेरचे वातावरणही चांगलेच तापले.

कोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली. त्यामुळे भडकलेल्या नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र या धमकीला न घाबरता गुरव यांनी, 'गडचिरोलीच काय पण घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,' अशा शब्दात प्रतिआव्हान दिल्याने महापालिकेच्या बाहेरचे वातावरणही चांगलेच तापले.

लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. याचा प्रत्यय आज  आला. महापालिकेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांना उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी बाणेदारपणे उत्तर दिले. हे उत्तर केवळ चर्चेचा विषय बनला नाही तर समाज माध्यमातून गुरव यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.

सूरज गुरव यांनी बाणेदारपणे त्यांना सांगितले की ”एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे’. सूरज गुरव यांनी दबावासमोर न येता स्पष्ट वक्तेपणाची रोखठोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा आणि कौतुक होताना दिसत आहे.

Web Title: Dont Try To Pressieruse Me Says Police Officer Suraj Gurav To Mla Satej Patil And Hasan Mushrif