

सांगलीत धक्कादायक डबल मर्डर! दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंचा वाढदिनीच खून करण्यात आला.
esakal
Sangli Police Investigation : सांगलीच्या गारपीर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहितेवर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून, शेखही ठार झाल्याचे वृत्त आहे.