कोल्हापूर : गणेशोत्सवात ध्वनीप्रदुणाचा गुन्हा दाखल असणारे होणार हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - गणेशोत्सव काळात यापूर्वी ध्वनीप्रदुषण केल्याचे गुन्हे दाखल असणाऱ्यांवर आता थेट हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. या कारवाई अंतर्गत यंद्याच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषण करणाऱ्या विरोधात पोलिस प्रशासनाची भूमिका काय असणार आहे याचे संकेत जणू डाॅ. देशमुख यांनी दिले. 

कोल्हापूर - गणेशोत्सव काळात यापूर्वी ध्वनीप्रदुषण केल्याचे गुन्हे दाखल असणाऱ्यांवर आता थेट हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. या कारवाई अंतर्गत यंद्याच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषण करणाऱ्या विरोधात पोलिस प्रशासनाची भूमिका काय असणार आहे याचे संकेत जणू डाॅ. देशमुख यांनी दिले. 

पूरपरिस्थितीत सक्रीय असलेली पोलिस यंत्रणा आता गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या तयारी लागली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदुषण खपवून घेणार नाही असे यापूर्वीच डॉ.  देशमुख यांनी स्पष्ट केले. उत्सवासाठी सुरू असलेल्या तयारी विषयी डॉ. देशमुख यांनी माहिती दिली.

गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काळे धंदेवाले, गुंड, सराईत चोरटे यांच्यावर हद्दपारीची प्रक्रिया सुरूच आहे. त्याचबरोबर यापूर्वी गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान ध्वनी प्रदुषण केल्याचा गुन्हा ज्या कार्यकर्त्यांवर दाखल असेल त्यांना उत्सव काळात जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रस्ताव संबधित पोलिसांमार्फत दाखल केले जावेत, याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबधितांवर प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात सुमारे सातशेच्या घरात साऊंड सिस्टीम मालक आहेत. त्यांना यापूर्वीच पोलिस प्रशासनातर्फे नोटीसा बजावल्या आहेत. ध्वनी प्रदुषण करणारी यंत्रणा त्यांनी भाड्याने देऊ नये. जर अशी यंत्रणा लावून ध्वनी प्रदुषण केले जात असल्याचे उघड झाले तर जागेवरच ती यंत्रणा जप्त केली जाईल, अशा कडक सूचनाही त्या नोटीशीत नमुद करण्यात आल्या असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

गणेश आगमन बंदोबस्त असा राहणार... 

  • बापट कॅंम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी भागात विशेष बंदोबस्त 
  • शहरात भागात पोलिस कर्मचारी ः 1000 
  • ग्रामीण भागात पोलिस कर्मचारी ः 600 
  • जिल्ह्यासाठी होमगार्ड ः 1200 
  • बाहेरून जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी ः 500 

राजारामपुरीतील मंडळाना क्रमांकानुसार प्रवेश 
राजारामपुरीत गणेश आगमण मिरवणुकीवर संपूर्ण शहराचे लक्ष लागून असते. तेथे सिस्टीम वाजली की विसर्जन मिरवणूकीचा मार्ग खुला... अशी मानसिकता जणू तयार झाली आहे. ही मिरवणुक पाहण्यासाठी लाखो नागरिकांची गर्दी होते. तेथेही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्याकडून ध्वनी प्रदुषण करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसा कोणी प्रयत्न केला तर संबधितांवर तातडीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही गोंधळ होऊ नये यासाठी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 13 मोठ्या मंडळांना आगमन मिरवणुकीत प्रवेश करण्यासाठीचा क्रमांक देण्यात आला आहे. त्यानुसारच त्यांना मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार आहे. 

जिल्ह्यातील 1138 जणांवर प्रस्ताव दाखल... 
काळे धंदेवाले, चोरटे, खून, मारामाऱ्याचे गुन्हे दाखल असणाऱ्या जिल्ह्यातील 1138 गुंडावर हद्‌पारीसह प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल केले आहेत. यात शहरातील 283 जणांचा समावेश आहे. यात शाहूपुरीतील 34 जणांवर हद्‌पार, 140 जणांवर प्रतिबंधात्मक तर राजारामपुरीतील 50 जणांचा यात समावेश आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर संबधितांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. 

विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त... 

  • जिल्ह्यातील 1400 पोलिस कर्मचारी 
  • होमगार्ड 1200 
  • राज्य राखीव दलाचे 300 पोलिस 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Abhinav Deshmukh comment