'डॉ. आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याची आवश्‍यकता' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने सामाजिक न्यायासह सर्व समाजाचे हित साधले जाणार आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टीकानोतून शासन प्रयत्न करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी आचरणात आणण्याची आवश्‍यकता असल्याची अपेक्षा प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केली. 

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीनेआयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून पोलिस आयुक्त महादेव तांबडे उपस्थित होते. कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विजय लोंढे आदी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या "महामानवाला अभिवादन' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Web Title: dr Babasaheb Ambedkar thaoughts important in life