चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीच्या अध्यक्षपदी डॉ. कौशिक गायकवाड यांची निवड

राजकुमार शहा 
शनिवार, 16 जून 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीच्या अध्यक्षपदी मोहोळ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ कौशिक संदीपान गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली यापुर्वीचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष प्रसाद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची बैठक सुरू झाली गुरव यांनी अध्यक्ष पदासाठी डॉ कौशीक गायकवाड यांचे नाव सुचविले. त्याला सर्वांनी एकमताने मान्यता दिली यावेळी संचालक उज्वल कोठारी अरविंद कोठारी नागनाथ सोनवणे सुरेश घाटगे, कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. गायकवाड यांना सहकार क्षेत्राचा मोठा अभ्यास आहे. तालुक्यात त्यांनी सरपंच सोसायटी सचिव यांच्या साठी वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन करून त्यांच्या कामात पारदर्शी पणा आणण्याचा प्रयत्न केला आहे, तर महिलांसाठी विविध परिषदेचे आयोजन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. आहेत डॉ. गायकवाड यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

औद्योगीक वसाहतीतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तो मार्गी लावुन आजारी व बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: dr kaushik gaikwad elected as president of chandramauli industrial area in mohol