डॉ. मेतन यांचा छायाचित्रांमधून 'निसर्गाशी नाती जुळवा'चा संदेश 

परशुराम कोकणे 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

प्रदर्शनात एकूण 120 छायाचित्रे असतील. प्रत्येक छायाचित्राखाली संदेश दिला आहे. पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी कशी करावी याची माहितीही प्रदर्शनात देण्यात येईल. राज्याबाहेर पहिल्यांदाच मी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन होत आहे. निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करणे, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल आवड वाढविणे, छायाचित्रिकरणाविषयी रुची निर्माण करण्याचा प्रदर्शनाचा उद्देश आहे. 
- डॉ. व्यंकटेश मेतन, वाइल्डलाईफ फोटोग्राफर

सोलापूर : अस्थिरोगतज्ञ आणि वाइल्डलाईफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी टिपलेल्या निसर्ग आणि वन्यजीवांच्या छायाचित्रांचे निसर्गाशी नाती जुळवा या विषयावरील प्रदर्शन बंगलोर येथील चित्रकला परिषद येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 9 ते 12 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत सर्वांसाठी खुले आहे. सोलापुरातील पर्यटन वाढावे यासाठी प्रदर्शनात सोलापूर स्मार्ट सिटीचे मार्केर्टींग करण्यात येणार आहे. 

डॉ. मेतन मागील 22 वर्षे पक्षीनिरिक्षण करीत आहेत. सहा वर्षांपासून वाइल्डलाईफ फोटोग्राफी करीत आहेत. जीवन शांत आणि आनंदी कसे जगावे हे त्यांनी निसर्गाकडून शिकले आहे. निसर्गामधील अनेक आश्‍चर्यकारक घटना त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. डॉ. मेतन यांना नॅशनल जिओग्राफीचे सदसत्व प्राप्त झाले आहे. त्यांची वन्यजीव छायाचित्रे ज्येष्ठ अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांच्या पक्षीकोषामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यांना कर्नाटक जंगल रेसॉर्टचे लॉयल्टी मेम्बरशिप मिळाली आहे. मागील महिन्यात त्यांचे छायाचित्र मुंबईमधील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. बंगलोर येथील प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांमधून लकी ड्रॉ काढून बक्षीस देण्यात येणार आहे. सरप्राईज गिफ्ट म्हणून सोलापूरची शेंगा चटणी, सोलापूरचे नॅपकीन देण्यात येणार आहे. तसेच स्मार्ट सिटीचे सोलापूरचे पर्यटन वाढावे यासाठी मार्केटींगही करण्यात येणार आहे. 

प्रदर्शनात एकूण 120 छायाचित्रे असतील. प्रत्येक छायाचित्राखाली संदेश दिला आहे. पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी कशी करावी याची माहितीही प्रदर्शनात देण्यात येईल. राज्याबाहेर पहिल्यांदाच मी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन होत आहे. निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करणे, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल आवड वाढविणे, छायाचित्रिकरणाविषयी रुची निर्माण करण्याचा प्रदर्शनाचा उद्देश आहे. 
- डॉ. व्यंकटेश मेतन, वाइल्डलाईफ फोटोग्राफर

Web Title: Dr Metan nature photography