डॉ. पवार यांनी इतिहासाचे वास्तव मांडले - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सखोल संशोधनातून इतिहासाचे वास्तव चित्र मांडण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.

कोल्हापूर - ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सखोल संशोधनातून इतिहासाचे वास्तव चित्र मांडण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अमृतमहोत्सव गौरव समितीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा घोंगडी, गौरवपत्र, गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाई वैद्य होते.

पवार म्हणाले, 'इतिहास लिहिताना इतिहासकाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. तो ज्या विचारधारेच्या माध्यमातून इतिहास लिहितो, तो इतिहास नवी पिढी वाचत असते. डॉ. पवार यांची भूमिका ही अखंडपणे सत्य व वास्तव मांडण्याची राहिली आहे. टीका-टिप्पणीची चिंता त्यांनी केली नाही. काही घटकांनी वेगळ्या पद्धतीने शिवपुत्र संभाजी महाराज यांची बदनामी केली. डॉ. पवार यांनी मात्र त्यांचे वास्तव चित्र समोर आणले.''

वैद्य कसा असा बोलतो?
भाई वैद्य यांनी उच्चवर्णीयांवर शाब्दिक प्रहार केल्यानंतर पवार म्हणाले, 'वैद्य असा कसा बोलतो, याचे अनेकांना आश्‍चर्य वाटेल; पण तो कायस्थ आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्याप्रमाणे प्रागैतिक विचारांची मांडणी करणारा असून, तिच त्यांची विचारधारा आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचे आश्‍चर्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.''

Web Title: DR. Pawar presented the reality of history