माजी आमदार राजेंद्र राऊत यांना भगवंत नक्कीच शक्ती देईल: डॉ. प्रकाश बुरगुटे

सुदर्शन हांडे
रविवार, 29 एप्रिल 2018

बालगोपाळांसह शहरवासियांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय, राज्य पातळीवर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा भगवंताची प्रतिमा भेट देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

बार्शी : माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारातून बार्शीकराना आठ दिवस अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. तसेच त्यांच्याच प्रयत्नाने तालुक्यातील खेळाडूंसाठी नव्याने आद्ययावत स्टेडियम उभारणी होत असून बार्शीच्या विकासासाठी भगवंत त्यांना नक्कीच शक्ती देईल असे मत शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांनी व्यक्त केले. 

भगवंत मैदान येथेल सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टेडियमच्या कामाचा शुभारंभ व भगवंत मोहत्सवातील शोभेच्या दारूकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरूण बारबोले, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सय्यद, प्राचार्य डॉ.प्रकाश थोरात, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, सचिव संतोष सुर्यवंशी, खजिनदार अजित कुंकूलोळ, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, प्रा.सुरेश लांडगे, भारत पवार, आयुब शेख, अरूण देबडवार, नाना सुरवसे, दादा साळुंखे, शिवशक्ती बँकेचे युवराज बारंगुळे, भारत उमाटे, विजय शिखरे, आप्पा लोखंडे यांच्यासह महोत्सव समिती, देवस्थान ट्रस्ट व नगरपालिकेचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते. स्टेडियम उदघाटना नंतर नेत्रदीपक अतिषबाजीला सुरवात करण्यात आली. 

शिवशक्ती बँकेच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वच्छ बार्शी, सुंदर बार्शी..बेटी बचाओ, बेटी पढाओ, असा सामाजिक संदेशही यातून देण्यात आला. शहरवासियांनी हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळयात साठवत या उपक्रमाचा आनंद घेतला. हा आतिषबाजीचा कार्यक्रम सुमारे तासभरापेक्षा अधिक वेळ सुरू होता. आकाशात खूप उंचीवर जावून उडणाऱ्या रंगीत आदल्यांनी नभांगण उजळून निघत होते. त्याचबरोबर धबधब्याप्रमाणे कोसळणारी तसेच कारंज्याप्रमाणे उडणारी आतिषबाजी, शिट्टीसारखा आवाज काढत आकाशात झेपावणारी सुरू नेत्रसुखद अनुभव देत होती. नर्गीस, नागफणा, बंदुकीचा आवाज, मोठया आवाजाच्या आदल्या व गावठी बंदुकीचा आवाज असे विविध प्रकार यामध्ये पहायला मिळाले. 

बालगोपाळांसह शहरवासियांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, यावेळी राष्ट्रीय, राज्य पातळीवर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षकांचा भगवंताची प्रतिमा भेट देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Web Title: dr prakash burgute statement