दारूच्या नशेत बापाने केला एका वर्षाच्या चिमुरड्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणातून पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्याचा खून केला. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.

नगर - दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणातून पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्याचा खून केला. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. चिराग सोहम कुमावत, असे या चिमुरड्याचे नाव आहे.

चिरागचे वडील सोहम व आई अर्चना कुमावत हे मूळचे राजस्थानचे आहेत. गुरुवारी रात्री सोहम दारूच्या नशेत घरी आला. त्याने रागाच्या भरात पत्नी व मुलाला मारहाण केली. मुलाला बऱ्याच वेळा उचलून आपटले. त्यातच त्याचा  मृत्यू झाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drinker father murder the child in nagar

टॅग्स