राज्यात ठिबक सिंचनावर तीन लाख हेक्‍टर ऊस आणणार - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

शंभर टक्‍के कर्जपुरवठा करणार
इस्लामपूर - राज्यात नाबार्डच्या सहकार्याने तीन लाख हेक्‍टर ऊस ठिबक सिंचनावर आणण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

शंभर टक्‍के कर्जपुरवठा करणार
इस्लामपूर - राज्यात नाबार्डच्या सहकार्याने तीन लाख हेक्‍टर ऊस ठिबक सिंचनावर आणण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

खोत म्हणाले, 'ठिबकसाठी शंभर टक्के कर्जपुरवठा करण्यात येईल. या कर्जावरील 50 टक्के व्याज राज्य सरकार भरेल. काही वाटा कारखाने उचलतील. शेतकऱ्यांना अडीच ते तीन टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी ठिबक सिंचनासाठी पतपुरवठा उपलब्ध होईल. वाळवा तालुक्‍यातील गोटखिंडी येथील पाणीपुरवठा संस्थेने ठिबक केले आहे. आता हा पॅटर्न राज्यभर राबवू. पाणीपुरवठा योजनांनी ठिबकसाठी पुढाकार घ्यावा. मराठवाडा, विदर्भ व खानदेशातील दुष्काळ हटवणे व क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी जागतिक बॅंकेच्या साह्याने कालबद्ध कार्यक्रम राबवणार आहोत. "सरकार शेतकऱ्याच्या बांधावर' या उपक्रमांतर्गत गावनिहाय कृषी ग्राम हक्क समित्या स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती ग्रामसभेत निवडली जाईल. नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण शिबिरे आणि विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवण्यात कृषी ग्रामहक्क समिती पुढाकार घेईल.''

खोत म्हणाले, 'आपला शेतकरी पिकवायला शिकला पण विकायला नाही. राज्याबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेकडे लक्ष आहे. कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळींची संख्या वाढवत आहोत. पश्‍चिम बंगाल व आसाम या राज्यांचा कांदा विक्रीसाठी दौरा करणार आहोत. शेतीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांचे ग्रामीण भागात जाळे उभारू.''

Web Title: Drip irrigation of sugarcane rolling three million hectares of state