

Agricultural Dragon Processing Industry
esakal
Dragon Fruit Wine Production : सांगली जिल्ह्यात गेल्या सात-आठ वर्षांत दुष्काळी तालुक्यांमध्ये झपाट्याने वाढलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या उत्पादनापासून आता वाईन तयार करण्यात येत आहे. पलूस येथील मदर युनिटमध्ये यंदा सुमारे ३५ हजार लिटर वाईनचे उत्पादन घेण्यात आले आहे. तीन वेगवेगळ्या ब्रँडद्वारे तिची विक्री केली जाणार आहे. उद्या (मंगळवारी) खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते या वाईनचे अनावरण होणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यात फळप्रक्रिया उद्योगाची नवी संधी निर्माण होत आहे.