बियाणे दिली पेरायला; पाणी नाही प्यायला... पशुधन धोक्यात

drought
drought

ब्रह्मपुरी (सोलापुर) : मंगळवेढा तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासनाने नोव्हेम्बर महिन्यात मका व ज्वारी   पेरन्यास दिली .यावर्षी पावसाची अवकृपा झाल्यामुळे  तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले, जिथे वर्षभर पाऊसच पडला नसल्याने  राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून तालुक्यात तब्बल १४९० किलो ज्वारी, मका २०८५ किलो  बियाणे जनावरांसाठी चारा करा, असे म्हणत वाटप करून शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्तांची कुचेष्टाच केली आहे.

खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीही यंदा पाऊस आला नाही. काही भागात विहीर, नदीच्या पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी थोडीफार पेरणी केली, ती सुद्धा वाया गेली. काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला व  जे पेरले ते पावसाभावी उगवले ही नाही.

तीव्र दुष्काळाने माणसाचे जगणे कठीण केलेले असताना, जनावरांचे तर माणसांपेक्षा जास्त हाल सुरू आहेत. दोन्ही हंगाम वाया गेल्याने येथे चारा उपलब्ध नाही. जनावरांच्या पाण्यासाठी शासनाकडे सध्या कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत चाऱ्यासाठी चारा डेपो,  शेतकऱ्याना थेट अनुदान देणे अपेक्षित असताना, शासनाने अजूनही निर्णय घेतला नाही.

शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा निर्माण करावा, त्यासाठी शासनाने केवळ मका,ज्वारी बियाणे वाटप करून शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचा आव आणला आहे. त्यामुळे संतापही व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करायचा आहे. ७/१२ उतारा, आधार कार्ड, किती जमीन आहे, त्यापैकी किती जमिनीत बियाणे पेरणार पण पुढचे ३ ते ४ महिने शेतकऱयाने मका पिकाला पाणी कुठून घालायचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सप्टेंबर ते  ऑक्टोबर हा रब्बी हंगामातील पेरणीचा कालावधी असतो. पाऊस नसल्याने यंदा पेरणी झाली नाही. पण  मका,ज्वारी पेरा म्हणणारे  शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. तालुक्यातील भागात बियाणे शंभर टक्के मोफत देऊन  बोगस योजनेपेक्षा म्हैशाळ चे पाणी मोफत आणि पुरेसे दिले तरच दुष्काळ सुसह्य होईल.

चारा डेपो आणि चारा छावण्यांत भ्रष्टाचार झाल्याच्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी तक्रारी झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यावेळी जनावरे जगली आणि छावणी मालकही जगले. आता तालुक्यात २०१२ पशु गणना नुसार  लहान जनावरे  २१५९५ , मोठी जनावरे ७२७६७  मेंढ्या २१४८३  आणि शेळ्या ५४७९१ एवढ्या आहेत.एकूण पशु धन १७०६३६ असून या पशुधनास दररोज १२७६.९१ मे. टन ओली वैरण, तर ५१०.७७ मे. टन सुका वाळलेल्या चाऱ्याची आवश्यकता आहे. दररोज ४० लाख ७० हजार २५०लिटर पाणी जनावरांसाठी पिण्यासाठी आवश्यक आहे. शासनाने त्याची सोय करण्याची गरज आहे.

२०१२ पासून आजतगायत जनावरांची वाढ झाली परंतु अजूनही शासनास ह्या विभागाची  ७ वर्षानंतरही पशुगणना करण्यास वेळ मिळाला नाही फ़क्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन माणसाची गणना करुण लाखो रुपये जाहिरातिवर खर्च करीत आहे परंतु जनावराचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून शेतकऱ्याला संकटास सामोरे जावे लागत आहे.

" तालुक्यात प्यायला पाणी नाही. जनावरे चाऱ्यासाठी तडफडत आहेत. मका पेरली गेली परंतु पिकाला पाणी कुठले द्यायचे, हे सरकारने सांगावे"
-- बलभीम माळी, जनहित शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com