माडग्याळमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर आयुक्त दीपक म्हैसकर संतापले

माडग्याळमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर आयुक्त दीपक म्हैसकर संतापले

जत - रोजगार हमीची कामे पूर्ण करूनही गेली दोन वर्षे बिले मिळाली नाहीत. तालुक्‍यात भीषण दुष्काळ पडला आहे. कामांसाठी शेतकरी स्थलांतरित होत आहेत. अशा परिस्थितीत रोहयो कामे सुरू करणे गरजेचे असताना प्रशासन चालढकल करीत आहे. अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर संतापले.

त्यांनी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांची खरडपट्टी केली. त्यांचा रुद्रावतार बघून सौ. वाघमळे निरुत्तर झाल्या. विभागीय आयुक्त म्हैसकर यांनी दुष्काळी भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाच्या कारभारबद्दल नाराजी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त श्री. म्हैसकर आणि जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी जत पूर्व भागातील दुष्काळाची पाहणी केली. याशिवाय शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी अनेक अडचणी विभागीय  आयुक्तांसमोर मांडल्या. निकृष्ट पाणी, बंद असणारी रोजगार हमीची कामे, टॅंकरच्या खेपातील गोलमाल, अशुद्ध पाणीपुरवठा, कामातील दिरंगाई, हाताला काम नसल्याने हजारो लोक स्थलांतर करत आहेत. पण  प्रशासन रोहयोची कामे सुरू करीत नाहीत, वैयक्तिक रोजगार हमी योजनेतून केलेल्या शेततळे, गोटा,  नालाबांध कामाचे गेली दोन वर्षे झाली पैसे मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांची अरेरावी खास करून गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून आयुक्त संतापले त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. कारभार सुधारण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक विभागाचा कामाचा आढावा जाणून घेऊन कामातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हमी श्रीमती किरण कुलकर्णी, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, उपविभागीय कृषी अधिकारी कांतापा खोत, तालुका कृषी अधिकारी संभाजी सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

मिनरल वॉटरसाठी धडपड 
जत दौऱ्यावर विभागीय आयुक्त येणार असल्याने प्रशासनाने सतर्कता दाखविली. दुपारी साहेबांना शुद्ध मिनरलचे वॉटर हवे म्हणून म्हसूलचे दोन कर्मचारी  शहरात पळापळ करीत होते. घोटभर पाण्यासाठी अख्खा तालुका तडफड करीत असताना अधिकाऱ्यास मात्र शुद्ध पाण्याची चिंता होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com