बुडणाऱ्या बापलेकीला शिक्षकाने वाचवले..

हुकूम मुलाणी
सोमवार, 23 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा ते सांगोला रोडवरील विहीरीत मुलीला पोहायला शिकविण्यासाठी गेलेल्या पण पोहताच येत नसल्यामुळे बुडणाऱ्या बापलेकीला तालुक्यातील डोंगरगाव येथील जि.प.शिक्षक अशोक इंगळे यांनी बुडण्यापासून वाचवले. 

सध्या उन्हाळ्यातील कडक उन्हापासून शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेकांची पावले विहीरीत पोहण्यासाठी जात असून शहरातील बसस्थानका शेजारील फळविक्रेते सिकंदर बागवान (वय 30) व मुलगी जोया (वय 7) वर्षे हिला पोहायला शिकवण्यासाठी सांगोला रस्त्यावर  विहीरीवर घेऊन गेले. या ठिकाणी पंचवीस अधिक जण आले होते. सर्वजण पोहण्याचा नादात होतो.

बागवान याची मुलगी जोया पायरीपासून आत गेल्या वर बुडू लागली तिला वाचवण्यासाठी वडिल पुढे गेले, मुलीने वडिलांना घट्ट मिठी मारली दोघेही बुडू लागले. ते दिसत नसल्यामुळे दरम्यान मुलीला पोहायला शिकवण्यासाठी गेलेले शिक्षक अशोक इंगळे यांनी थेट उडी मारून वडिलांचा हात पकडला. पण मुलगी दिसेना पण बापाला वर काढल्यावर मुलीने पायाला मिठी मारली होती दोघांनाही वर काढले तेव्हा समजले की वडिलांना पोहताच येत नव्हते. त्यावेळी शेजारील नागरिक जमा झाले. त्यामुळे या घटनेत काळ आला होता पण वेळ आली नव्हती.या बाप लेकी वाचवल्याबद्दल शिक्षक अशोक इंगळे यांचे अभिनंदन होत आहे

Web Title: Drowning girl and father was saved by the teacher