esakal | सांगलीतील दुधनकर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; आरोग्यविभागाची कारवाई

बोलून बातमी शोधा

सांगलीतील दुधनकर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; आरोग्यविभागाची कारवाई
सांगलीतील दुधनकर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड; आरोग्यविभागाची कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : शिंदे मळा येथील दुधनकर हॉस्पिटलने रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल महापालिकेने हॉस्पिटलला एक लाखाचा दंड केला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

शिंदे मळा येथे दुधनकर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयाने जैव वैद्यकीय कचरा महापालिकेने ठरवून दिलेल्या कंपनीस न देता तो महापालिकेच्या घंटागाडीत टाकून घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केला. याची माहिती मिळताच आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी याची माहिती घेतली. त्यानुसार सदरचा जैव वैद्यकीय कचरा दुधनकर हॉस्पिटलचाच असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुधनकर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड करण्यात आला. या दंडाची वसुली स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी केली.

हेही वाचा- रांगाच रांगा; "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं'

जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्यास कारवाई : आयुक्त कापडणीस

सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल प्रशासनाने आपल्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर किंवा महापालिकेच्या कचरा कंटेकर अथवा घंटागाडीमध्ये टाकू नये. यासाठी नियुक्त केलेल्या सुर्या एजन्सीकडे सदरचा कचरा जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास संबधित हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई बरोबर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे.

Edited By- Archana Banage