मंगळवेढा : बोराळे नाक्यात शौचालयाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संताप

हुकूम  मुलाणी
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मंगळवेढा : येथील बोराळे नाका परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय वाईट असून शौचालयाचा वापर करताना या परिसर नागरिकाला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने येथील या परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

मंगळवेढा : येथील बोराळे नाका परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय वाईट असून शौचालयाचा वापर करताना या परिसर नागरिकाला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने येथील या परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या तयारीचे चौकाचौकात फलक लावले. तसेच मंगळवेढा नगरपरिषदेने 'स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढा' नाराही दिला. यामध्ये वारी परिवार या सामाजिक संस्थेसह नागरिकाच्या सहकार्याने मंगळवेढा शहर हागणदारी मुक्त करण्यात आले. परंतु, सध्या बोराळे नाका परिसरातील शौचालयाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तसेच ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर महिलांना व लहान मुलांना उकिरडा व गटारातुन शौचालयात जावे लागत आहे.  खरोखरच जीवंतपणीच नागरीकांना नरक यातनांचा अनुभव येत आहे. तसेच आडोसा व्यवस्थित नसल्यामुळे महीलांची कुचंबना होत आहे. शहरातील सर्वच महिला शौचालयाचे दरवाजे व किरकोळ दुरूस्ती तात्काळ करणे आवश्यक असताना. अन्यथा उघड्यावरती लोक शौचालयास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासन विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे

''वारी परिवाराने केलेल्या सर्वेक्षणात शौचालयाचे पाणी बाजुच्या खड्यात सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून पूर्ण परिसर अस्वच्छ झालेला असून अनेक रोंगाचा प्रसार होत आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. ''
- सतीश दत्तु, अध्यक्ष, वारी परिवार 

''शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीचे आदेश पालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. सर्व दुरुस्ती व स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या साठे नगर येथे काम सुरू आहे. त्यामुळे थोड्या दिवसात या भागातील लोकाचा हा प्रश्न संपणार आहे.''
 - 
डॉ.निलेश देशमुख मुख्याधिकारी

Web Title: due to bad condition of Toilets citizens are aggravation in borale naka of maglwedha