greps
greps

ढगाळ वातावरणामुळे व्यापाऱ्यांचा द्राक्षे खरेदीसाठी हात आखडता

पांगरी - पांगरीसह अन्य गावाच्या परिसरात द्राक्षे हंगामास सुरूवात झाली आहे. तरी गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व्यापारी वर्गानी माल खरेदी करण्याबाबत हात आखडता घेतला आहे. या निर्माण झालेल्या स्थितीमुळे द्राक्षे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

द्राक्षे बागेस संरक्षीत विमा असणे गरजेचे आहे. पाण्याअभावी द्राक्षे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यानंतर भाजीपाल्याच्या उत्पादनात समानानकारक भाव मिळत नसल्याने शेतकर्याने बहुवर्षीक पिक म्हणून पुन्हा द्राक्षे बागेत पसंती दिली आहे. हळूहळू द्राक्षे क्षेत्रात वाढ होत चालली आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला असता तर द्राक्षे लागवडीमध्ये झपाट्याने वाढ झाली असती. सध्या द्राक्षे विक्री हंगामास नुकतीच सुरूवात झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने व्यापार्यानी माल खरेदी करण्यामध्ये हात आखडता घेतला आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या द्राक्षे बागेतील माल सलग उचलला जात नाही. तीन दिवसात संपणारा द्राक्षे मालास व्यापारी वर्गाकडून पंधरा दिवसांचा कालवधी लागला जात आहे. त्यामुळे द्राक्षे हंगाम लांबणीवर जात आहे.

सध्या द्राक्षे खरेदीसाठी वाशिम, नांदेड, निजामाबाद, पुसद, यवतमाळ, नागपूर, विजयवाडा आदी ठिकाणाचे व्यापारी येऊ लागले असून विक्रीसाठी तयार झालेल्या बागेमध्ये जाऊन माल घेण्यामध्ये चढाओढ दिसून येत नाही. ढगाळ वातावरण नाहीसे झाल्यानंतर मात्र द्राक्षे हंगामात वेग येणार आहे. सध्या माणिकचमन ३० ते ४० रूपये, सुपर सोनाका ३५ ते ४० रूपये,साधी सोनाका ३५ ते ४० रूपये पर्यत दर मिळत आहेत. नव्या वाणची लागवड झाली परंतु, या भागात मालावर बागा नसल्याने दर निश्चित नाहीत.

द्राक्षेमध्ये नवनवीन जातीचे वाण येऊन लागेल असून हे वाण आकर्षक ठरत आहेत. द्राक्षेसाठी ग्राहक हा चोखंदळ बनला असून, ग्राहकांच्या पंसतीनुसार द्राक्षे लागवडीमध्ये बदल केले जात आहेत.

त्यादृष्टीने सुधारीत जातीच्या द्राक्षे पिकांचा शोध घेत लागवडी होऊ लागल्या आहेत. या जातीचे वाण उत्पादनास चांगले व दर्जेदार असल्याने किफायदेशीर ठरू पाहत आहेत. यामध्ये आर.के., एस.एस.एन., धनाका, आनुश्का या नव्याने द्राक्षे वाणची शेतकरी लागवड करू लागला आहे. या दोन वर्षांच्या कालवधीत अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षे लागवड केली असून हळूहळू यात वाढ होत असलेले चित्र दिसू लागले आहे. नव्याने लागवड केलेल्या द्राक्षे वाण यावर्षी फळयुक्त अशा बाग तयार झालेले दिसून येत नाहीत.

या बागाची मशागतीत यंत्रीककरणाचा वापर होऊ लागला असून, मजूरीवर मात करत ट्रॅक्टरच्या सह्याने बागेमध्ये फवारणी केली जात आहे. त्यामुळे मजूरीमध्ये बचत होऊ लागली आहे. यात एकरी फवारणीसाठी हजार रूपये तर जी.ए.सारख्या संजीवकेच्या फवारणी अडीच हजार रूपये लागत आहेत. या ट्रॅक्टरव्दारे होणाऱ्या फवारणीच्या खर्चामध्ये हे बचत करण्यासाठी स्वतः ट्रॅक्टर खरेदीच्या मानसिकेत अनेक शेतकरी असल्याचे दिसून येत आहेत. याकरिता शासनाने छोटे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सवलतीच्या दारात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी द्राक्षे बागायतदारामधून होत आहे.

विमा कंपन्या जवळपास सर्वच पिकांचा विमा शेतकऱ्यांकडून भरून घेतला जातो. मात्र द्राक्षे हे अत्यंत नाजूक पिक वातावरणातील तत्काळ बदलास बळी पडते. त्यामुळे या पिकांसाठी संरक्षीत विमा असणे गरजेचे आहे. आजपर्यंत द्राक्षे बागेसाठी पिक विम्याची संरक्षीत रक्कम मिळू शकली नाही. कारण शासनाने ठरवून दिलेल्या निकषात शेतकरी बसू शकत नाही. यामध्ये द्राक्षे हंगाम जानेवारी अखेरपर्यंत धरला जातो. परंतु, या भागातील हंगाम जानेवारी नंतर चालू होतो. याच कालवधीत दरवर्षी अवकाळी पाऊस, गारपिटीचा धोका अनुभवला आहे. हा हंगाम मे अखेरपर्यंत सुरु असतो. तरी शासनाने द्राक्षे विमा निकषात बदल करून मे पर्यंत कालवधी वाढ करावी अशी मागणी द्राक्षे बागायतदारामधून होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com