बाजारभाव नसल्याने उभे पपईचे पीक दिले सोडून

papaya
papaya

केत्तुर (सोलापुर) - पोमलवाडी (ता.करमाळा) येथील प्रयोगशील शेतकरी प्रशांत शेलार यांनी दीड एकरातील हातातोंडाशी आलेले पपईचे पीक योग्य दर मिळत नसल्याने सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच केलेल्या या पिकापासून सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले असून, या पपई उत्पादक शेतकऱ्याचे किमान अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

करमाळा तालुक्याच्या उजनी लाभ क्षेत्रातील ऊस पिकाला पर्याय म्हणून युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पपईचे पिक घेतले परंतु, बाजारात पपईला समाधानकारक दर मिळत नसल्याने त्यांच्यावर उभे पिक सोडून देण्याची वेळ आली आहे. गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकरी सध्या दुष्काळाचा सामना करीत आहेत. असे असताना शेलार यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर एप्रिल महिन्यात तैवान जातीच्या बाराशे पपईच्या रोपांची लागवड केली. पिकाला फळधारणाही चांगली झाली. फळे तोडणीस आली परंतु, पुणे मार्केटमध्ये पपईला सध्या केवळ ४ ते ५ रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षी याच काळात तो १५ ते १७ रुपये असा होता.

यावर्षी वारंवार बदलत असलेल्या हवामानामुळे पपईचा उत्पादनात घट झाली. तर, बदलणारे हवामानामुळे औषध फवारणीचा खर्चही वाढला. त्यातच योग्य दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. माल वाहतुकीसाठी स्वतःच्या खिशाला "चाट" लागत असल्याने हा सगळा खेळच आतबट्टयाचा झाल्याने उभे पपईचे पिक फळासह तसेच सोडून देण्याची वेळ आल्याचे प्रशांत शेलार यांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com