मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळेच वंचित गावांना न्याय : शैला गोडसे

हुकूम मुलाणी 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

र्म्हैसाळ योजनेमध्ये पाण्यापासून वंचित असणार्या गावांचा समावेश जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळेच  झाला आहे. असे शैली गाेडसे यांनी सांगितले.

मंगळवेढा : र्म्हैसाळ योजनेमध्ये पाण्यापासून वंचित असणार्या गावांचा समावेश जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळेच  झाला आहे. त्यामुळे या कामांबाबत भागातील जनताच दूध का दूध दुध का पाणी ठरविणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी व्यक्त केले.

म्हैसाळ योजनेतील नव्याने समावेश केलेल्या गावांची माहिती देण्यासंदर्भात शिवसेनेच्या मंगळवेढ्यातील कार्यालयात फेसबुक लाईव्ह पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे, नारायण गोवे, तुकाराम भोजने, विनोद कदम आदी उपस्थित होते.

पुढे त्या म्हणाल्या, ऐन दुष्काळात मंगळवेढ्याच्या हिश्याचे शिरनांदगी तलावातील पाणी सोडण्यासाठी आंदोलन केल्यानंतर आसबेवाडी येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना या भागातील तलावातील पाणी सोडण्यासाठी पाइपलाइनला अतिरिक्त चेंबर बसवण्याची मागणी करताना मूळ लाभक्षेत्रात या गावाचा समावेश नसल्याचे दिसून येताच या भागातील शेतकरयांनी काम बंद पाडल्यावर जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने हा प्रश्न शासनस्तरावर नेला. म्हैसाळ योजनेतील वंचित गावांचा समावेश करण्यासंदर्भात जलसंधारणमंत्र्यांचा माध्यमातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक घेऊन पाठपुरावा केला. त्या संदर्भात सांगली येथील कार्यालयातून प्रस्ताव पुणे येथील कार्यालयात पाठवला त्यामध्ये निघालेल्या त्रुटीची पूर्तता करून अखेरीस या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

दरम्यान, या सर्व लढ्याप्रसंगी या भागातील शेतकरी सोबत होते. त्यामुळे या कामाचे श्रेय कोणाचे हे सांगायची गरज नाही. त्यामुळे या भागातील सलगर खु....105  येळगी....42.7 आसबेवाडी...19.23 लवंगी...93.77 , शिवणगी....81.81, हुलजंती...49. सोड्डी 112.06 सलगर बु..123.17 क्षेत्र  ओलिताखाली येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Minister Tanaji Sawant justice to the disadvantaged villages says Sheila Godse