
तासगाव : तासगाव- कवठेएकंद दरम्यान डंपर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात बालेखान गुलाब तांबोळी (वय ७०) हे डंपरखाली सापडून जागीच ठार झाले, तर मोटारसायकल वर मागे बसलेली त्यांची पत्नी परवीन बालेखान तांबोळी या जखमी झाल्या. अपघातामुळे सुमारे दीड तास सांगली- तासगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.