कर्डिलेंचा कोठडीतील मुक्काम वाढला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नगर : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा एक दिवसाची वाढ करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी कर्डिले अटकेत आहेत. 

नगर : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा एक दिवसाची वाढ करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी कर्डिले अटकेत आहेत. 

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खूनप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले होते. शनिवारी (ता. 7) रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयावर जगताप समर्थकांनी हल्ला करून त्यांना सोडवून नेले होते. या गुन्ह्यात कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. कर्डिले यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. गुन्ह्याच्या शोधासाठी कर्डिले यांच्यासह 17 जणांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली.

Web Title: duration of shivaji kardile custody increase