उपवनसंरक्षकांकडून विधानसभेचीही दिशाभूल

- सुनील पाटील
गुरुवार, 12 जानेवारी 2017

कोल्हापूर - मौजे कुंभोज व तमदलगे (ता. शिरोळ) येथे जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट आणि बेकायदा केली आहेत, तरीही तत्कालीन उपवनसंरक्षक नाईकडे यांनी विधानसभेतील तारांकित प्रश्‍नाला लेखी स्वरूपात खोटी उत्तरे देऊन विधानसभेचीच दिशाभूल करण्याचा कारनामा केला आहे.

कोल्हापूर - मौजे कुंभोज व तमदलगे (ता. शिरोळ) येथे जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट आणि बेकायदा केली आहेत, तरीही तत्कालीन उपवनसंरक्षक नाईकडे यांनी विधानसभेतील तारांकित प्रश्‍नाला लेखी स्वरूपात खोटी उत्तरे देऊन विधानसभेचीच दिशाभूल करण्याचा कारनामा केला आहे.

जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गालबोट लावण्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांकडून झाला आहे. कुंभोज व तमदलगे येथे जलयुक्तची निकृष्ट कामे झाली आहेत. स्थानिकच्या आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी यावर  आवाज उठविला नाही; पण मुंबई येथील आमदाराने तारांकित प्रश्‍न विचारून यावर आवाज उठवला. त्यानंतर या कामाची चौकशी करून माहिती मागविली होती; मात्र उपवनसंरक्षकांनी वस्तूस्थितीऐवजी चुकीची माहिती देऊन विधानसभेचीच दिशाभूल केली आहे. जलयुक्तची कामे करण्यासाठी प्रशासकीय मंजुरीसह तांत्रिक मंजुरी घ्यावी लागते. ती मंजुरी घेतली नसल्याने वनअभियंत्यांनी करवीर वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर यांनी मनमानी दरांची अंदाजपत्रके तयार करून व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांच्या खोट्या सह्या करून तांत्रिक मंजुरी घेतल्याचे भासवून भ्रष्टाचार केला असल्याबाबत जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याकडे माहिती मागविली होती. 

यामध्ये २७ एप्रिल २०१६ ला कुंभोज किंवा तमदलगे येथील जलयुक्तच्या कामांना कोणत्याही प्रकरची मंजुरी घेतलेली नाही. शेरे, सही व शिक्का बनावट असल्याचे कार्यकारी अभिययंत्यांनी उपवनअभियंत्यांना दिली आहे, तरीही वनसंरक्षकांनी विधानसभेला दिलेली माहिती तांत्रिक मंजुरीसह सर्व कायदेशीर असल्याचे सांगितले आहे. 

ज्या ठिकाणी बंधारे बांधयचे आहेत, ही ठिकाणी चुकीची असतानाही निंबाळकर यांनी मनमानीपणे काम करून शासकीय निधीचा गैरवापर केला आहे. कामातील निकष धाब्यावर बसवून अधिकाऱ्याने स्वार्थ साधला आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शासनाची ही योजना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लाभदायक आहे; पण ज्याकडून ही कामे करायची आहेत, त्यांना याचे सोयर-सुतक नसल्याचे हाती आलेल्या कागदपत्रावरून दिसत आहे. हे काम करताना ई-निविदा किंवा निविदा पद्धतीचा अवलंब करून त्रयस्त यंत्रणेमार्फत काम केल्याचेही सांगितले आहे;

मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता दिसून येत नाही. कामगाची गुणवत्ता पाहूनच ठेकेदाराला कामाची रक्कम दिली असल्याचे ही उपवनसंरक्षक नाईकडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे; मात्र या कामाबाबत उपवन अभियंत्यांनी १ जून २०१६ ला केलेल्या चुकीच्या कामांची रक्कम वसुली करण्याबाबतच अहवाल प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना दिला आहे.

Web Title: dy. forest security confused to vidhansabha