सेवानिवृत्त होण्याआधी DYSP राजाराम पाटील यांचा 'आई' ला सॅल्युट!

सेवानिवृत्त होण्याआधी DYSP राजाराम पाटील यांचा 'आई' ला सॅल्युट!
Summary

घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान होता.

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे मोठे बंधू राजाराम (तात्या) पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. आर.आर.पाटील म्हणजेच राजाराम पाटील यांची काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयातून कोल्हापूर परिसरातील करवीर येथे डीवायएसपी म्हणून नियुक्ती झाली होती. राजाराम पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात दीड वर्ष सहाय्यक पोलिस आयुक्तपदी काम केले. साधे राहणीमान आणि उच्च विचार असा पाटील यांचा स्वभाव आहे. भेटणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना आर.आर.पाटील हे आपुलकीने बोलायचे. आज त्यांच्या सेवेतील शेवटचा दिवस. त्यांच्याविषयी कुटुंबातील सदस्याने एक भावनिक पोस्ट व्हायरल केली आहे.

आज माझे मोठे चुलते राजाराम (तात्या) पाटील सेवानिवृत्त होत आहेत. व्यक्तिगत माझ्या आयुष्याला बहुतांश आकार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या तात्यांची आज सेवानिवृत्ती. कुटुंब म्हणून आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. त्याची पार्श्वभूमी सुध्दा काहीशी तशीच आहे. सुरुवातीच्या काळात भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी आबांच्या कानावर घातली होती, त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा आज सुध्दा सांगताना त्यांचे डोळे भरून येताना मी पाहिलं आहे. घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान होता.

सेवानिवृत्त होण्याआधी DYSP राजाराम पाटील यांचा 'आई' ला सॅल्युट!
जोतिबा मंदिराची सुरक्षा फक्त एकाच पोलिसाच्या खांद्यावर; ठाणं कुलूपबंदच

आबा गृहमंत्री असताना कधीही गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता त्यांनी काम केले आणि नेहमीच त्यांनी ते अंतर ठेऊन काम केले. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही, हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे लक्षात येतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी तयार केलेला लोकांचा संग्रह आणि तेथील लोकांना त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे, असं मला नेहमी वाटतं.

आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या माझ्या आज्जीला सॅल्यूट करून ते रवाना झाले. आर आर आबांचा मुलगा म्हणून जेवढा अभिमान आहे तितकाच आभिमान डी.वाय.एस. पी आर आर तात्यांचा पुतण्या म्हणून आहे आणि राहील एवढच आजच्या दिवशी मला त्यांना सांगायचंय.

सेवानिवृत्त होण्याआधी DYSP राजाराम पाटील यांचा 'आई' ला सॅल्युट!
ना मंत्रिपदाचा बाज, ना डामडौल; गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com