इ-नाम प्रणालीद्वारे शेतमालाचे व्यवहार

हुकूम मुलाणी
रविवार, 24 जून 2018

मंगळवेढा : येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये विक्रीसाठी आलेल्या मालाला चांगला दर मिळावा म्हणून शेतीमालाचे ई-नाम या प्रणालीव्दारे सौदे ऑनलाईन सुरू करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष सोमनाथ आवताडे यांनी दिली. या प्रणालीत राज्यातील 145 बाजार समीत्या निवडण्यात आल्या आहेत. त्यात मंगळवेढ्याचा समावेश असून शेतकऱ्यांसाठी शेतीमालाबरोबर तुर, मका, डाळीब, कांदयाच्या विक्रीची देखील बाजारपेठ तालुक्यातच उपलब्ध करुन दिली.

यामुळे पंढरपूर, मोहोळ, चडचण, सांगोला येथील शेतकरी मंगळवेढ्यास येत असतात. सकाळच्या सत्र शेतीमालाची विक्री करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यां उपासमार होवु नये म्हणून 1 रु इतके नाममात्र शुल्क घेवून नाष्टयाची सुविधा केल्यामुळे अन्य ठिकाणापेक्षा शेतकऱ्यां मंगळवेढयाच्या शेतीमाल खरेदी केंद्राला अधिक पसंती शेतकऱ्यांनी दिली. आता नव्या ई-नाम या प्रणालीत सौदे प्रणालीत स्थानिक व इतर राज्यातील व्यापारी यात सहभागी होणार आहेत. 

बाजार समितीच्या प्रवेशव्दाराला मालाची नोंद व वजन केले जाणार असून विक्री केलेल्या मालाच्या रकमा थेट बॅक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे उत्पादित मालाला चांगला दर मिळणार आहे. नवी प्रणाली बसविण्यासाठी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तीस लाखांचा निधी मंजूर झाला.

Web Title: E-nam system develop for farmers