अर्धा लाख सोलापूरकरांनी केला 'ई टॉयलेट'चा वापर 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 21 जुलै 2018

या यंत्रणेची पाच वर्षे देखभाल संबंधित कंपनीच करणार आहे. स्त्रियांसाठी असलेल्या ई टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेन्डींग मशिनही बसविण्यात आली आहे. या ई टॉयलेटच्या स्वच्छतेचे मानक हायजीन स्टेटस वेबवरून तपासले जाते. तसेच ई-टॉयलेट ऍपद्वारे जीपीएस लोकेशन तसेच तक्रार व सुचनाही नोंदविता येणार आहेत. 

सोलापूर : "ई टॉयलेट'च्या वापराबाबत सोलापूरकर सकारात्मक झाले आहेत. त्याचा वापर वाढल्यामुळे आणखीन 40 ठिकाणी ही सुविधा करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत 52 हजार 875 जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

शहरात पाच ठिकाणी महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे 10 ई-टॉयलेट बसविण्यात आले आहेत. ते सर्व सुरू असून, त्याचा वापरही होत आहे. किती लोकांनी रोज त्याचा वापर केला, त्याचीही नोंद होत आहे. होम मैदान परिसरात स्वच्छतागृहाची सोय नव्हती. ही सुविधा केल्यामुळे सिद्धेश्‍वर मंदिर तसेच या भागात येणाऱ्या नागरिकांची विशेषतः महिलांची सोय झाली आहे. संकुचित वृत्तीच्या लोकांनी ही सुविधा उपयोगाची नाही, त्याचा कोणी वापर करणार नाही असे वातावरण तयार केले होते. मात्र या दहा ठिकाणी झालेली सोय व झालेला वापर पाहिल्यामुळे उपयुक्तता सिद्ध झालीआहे. 

या यंत्रणेची पाच वर्षे देखभाल संबंधित कंपनीच करणार आहे. स्त्रियांसाठी असलेल्या ई टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेन्डींग मशिनही बसविण्यात आली आहे. या ई टॉयलेटच्या स्वच्छतेचे मानक हायजीन स्टेटस वेबवरून तपासले जाते. तसेच ई-टॉयलेट ऍपद्वारे जीपीएस लोकेशन तसेच तक्रार व सुचनाही नोंदविता येणार आहेत. 

या ठिकाणी आहेत ई टॉयलेट 
ठिकाण कुणासाठी आतापर्यंत वापर 
होम मैदानलगत स्त्री व पुरुषांसाठी 9837 
साखर पेठ अग्निशमन केंद्र स्त्री व पुरुषांसाठी 27624 
जिल्हाधिकारी कार्यालय स्त्री व पुरुष, दिव्यांग 1811 
महापालिका आवार स्त्री व पुरुष, दिव्यांग 6470 
न्यायालय आवार स्त्री व पुरुषांसाठी 1205 
एकूण 52875

Web Title: e toilet use in Solapur