प्रत्येक तालुक्‍यात महिन्याला झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे शिबिर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात महिन्यातून एकदा झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात महिन्यातून एकदा झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांनी दिली. 

तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत चालले आहे. याला एकच पर्याय म्हणजे सुभाष पाळेकर यांची शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हा आहे. या शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन स्वतः श्री. पाळेकर देशात तसेच परदेशात शिबिरांच्या माध्यमातून करत आहेत. देशातील तसेच परदेशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान कसे पोचवता येईल, या विचारातून कोल्हापुरात 24 ते 26 फेब्रुवारीअखेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिराचे उद्‌घाटन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आध्यात्मिक मार्गदर्शक संजीव कुलकर्णी, तानाजी निकम, निवृत्त पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब गवाणी आदी उपस्थित होते. या शिबिरात 63 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. त्यात प्रत्येक तालुक्‍याला प्रतिनिधित्व मिळेल, असे नियोजन करण्यात आले होते. 

जिल्ह्यातील 1139 गावांत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शून्य खर्चाची नैसर्गिक शेती पोचवून जिल्ह्यातील प्रत्येकाला विषमुक्त अन्न मिळेल. तसेच कॅन्सरमुक्त व व्याधीमुक्त गावे करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असे या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांच्यासह विनायक पाटील, महेश पाटील यांनी सांगितले. 

या शिबिरात झिरो बजेट शेतीच्या माध्यमातून प्रतिएकर प्रतिवर्ष 12 लाख रुपये उत्पादन घेतलेल्या धर्मराज बिराजदार यांचे शेती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बघण्याचा व संवाद साधण्याचा लाभ प्रशिक्षणार्थींना देण्यात आला. 

Web Title: Each month, in zero budget natural farming camp