विषारी पदार्थ खाल्ल्याने दहा श्वानांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नगर पालिकेने शहरातील मोकाट श्वानांना विषारी पदार्थ दिला आणि पदार्थामुळेच या सर्व श्वानांचा मृत्यू झाल्याचा आरोप 'पीपल्स फॉर अनिमल'च्या  सदस्यांकडून करण्यात येत आहे.

नगर : नगर जिल्ह्याच्या नजीक असलेल्या महादेवपुरा परिसरातील दहा मोकाट श्वानांचा मृत्यू झाला. विषारी पदार्थ खाल्ल्याने या श्वानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.

नगर पालिकेने शहरातील मोकाट श्वानांना विषारी पदार्थ दिला आणि पदार्थामुळेच या सर्व श्वानांचा मृत्यू झाल्याचा आरोप 'पीपल्स फॉर अनिमल'च्या  सदस्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या मृत श्वानांचे शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

Web Title: By eating toxic substances ten dogs died in Nagar

टॅग्स