शाळांनाच असे लागले अंधश्रद्धेचे ग्रहण...

On the eclipse, all government and private schools in the taluka were given half-day leave nipani marathi news
On the eclipse, all government and private schools in the taluka were given half-day leave nipani marathi news
Updated on

खानापूर ( बेळगाव ) - ग्रहणाबाबत आजही अंधश्रद्धा पाळल्या जातात. पण, ज्या शिक्षण खात्याकडून अंधश्रध्दांचे समूळ उच्चाटनाची अपेक्षा करावी, त्याच खात्याकडून गुरुवारी (ता. २६) ग्रहणानिमित्त अर्धा दिवस शाळांना सुटी दिली. एवढेच नाही, तर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना तब्बल दीड तास उशिरा जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ग्रहण सुटेपर्यंत शाळा बंद 

ग्रहणानिमित्त तालुक्‍यातील सर्वच सरकारी व खासगी शाळांना अर्धा दिवस सुटी दिली होती. ग्रहण सुटेपर्यंत शाळा भरवल्या गेल्या नाहीत. शहराजवळील मोजक्‍या शाळा दुपारनंतर सुरु केल्या. परंतु, ग्रामीण भागातील शिक्षकांनी मात्र दांडी मारल्याची तक्रार अनेक गावांतून होऊ लागल्या आहेत. घरातून पालक त्यांच्या पाल्यांना ग्रहण काळात बाहेर सोडणार नाहीत, या समजातून ही सुटी दिल्याची चर्चा आहे. खरंतर सुटी देण्याऐवजी शाळा भरवून ग्रहणाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची नामी संधी या निमित्ताने तालुक्‍यातील शिक्षकांनी गमावली असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.

ग्रहण असल्यामुळे जेवण उशीरा

एकीकडे शाळांना सुटी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचे काम खात्याकडून झालेच; त्याशिवाय शिक्षकांनाही ग्रहणासाठी ताटकळत ठेवल्याची गंभीर घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गणित कलिका आंदोलन आणि जीवन कौशल्य यासंदर्भातील प्रशिक्षण सुरू आहे. त्यात दररोज ८० शिक्षक सहभागी होतात. आजही येथील सीआरसी केंद्रात प्रशिक्षण सुरू होते. दुपारी जेवणाची वेळ टळून गेल्यानंतरही जेवण मिळाले नाही. याबाबत चौकशी केल्यानंतर ग्रहण असल्यामुळे जेवण उशीरा दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. काही शिक्षकांच्या सांगण्यावरूनच हे दोन्ही निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे एका अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले.

गैरसमज दूर करण्यात अनुत्तीर्ण

एकंदर विद्यार्थ्यांच्या मनातील ग्रहणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात खाते आणि शिक्षक अनुत्तीर्ण ठरले आहेत. शिक्षकांना उशिरा जेवण देऊन ही अंध परंपरा कायम राखण्याचा धडाच जणू शिक्षकांना दिल्याची चर्चा आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी प्रभारी गट शिक्षणाधिकारी आप्पाण्णा अंबगी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com