esakal | संकेश्वरात बनली 5 तासांच्या चार्जिंगवर धावणारी इको फ्रेंडली मोटार
sakal

बोलून बातमी शोधा

संकेश्वरात बनली 5 तासांच्या चार्जिंगवर धावणारी इको फ्रेंडली मोटार

संकेश्वरात बनली 5 तासांच्या चार्जिंगवर धावणारी इको फ्रेंडली मोटार

sakal_logo
By
आनंद शिंदे

संकेश्वर : येथील इलेक्ट्रीक अभियंते प्रसन्ना दयानंद केस्ती यांनी स्वतः विविध गाड्यांचे सुटे भाग वापरून प्रदूषणविरहित, हाताळण्यासाठी सोपी इलेक्ट्रीक मोटार (electric motar) बनविली आहे. पर्यावरणपूरक (eco friendly) व महागड्या पेट्रोलला पर्याय ही मोटार असेल, असे प्रसन्ना केस्ती यांनी सांगितले. केस्ती यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण येथील एस. एस. के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर बेळगावच्या (belgaum) केएलई शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदवी घेतली. बेळगावात स्वतःचे इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांचे शोरूम आहे.

सतत नवनवीन काहीतरी बनविण्याच्या ध्येयातून प्रसन्ना केस्ती यांनी इलेक्ट्रीक मोटार बनविली आहे. वर्षापूर्वी ४० हजार खर्चातून इलेक्ट्रिक दुचाकीही बनविली आहे. दोन युनिट विजेवर म्हणजे १२ रुपयांत ती ७० किमी धावते. सध्या दुचाकी वापरात आहे. मोटारीमध्ये सुधारणा करणार आहोत. त्यानंतर सामान्यांना वापरण्यायोग्य झाल्यास कंपनीशी कराराचा विचार असल्याचे केस्ती यांनी सांगितले.

हेही वाचा: आंबोलीतील दरीत तरुणीची उडी

तीन लाख खर्च

मोटार बनविण्यासाठी प्रसन्ना केस्ती यांना पाच महिन्यांचा कालावधी लागला. तीन लाख रुपये खर्च आला. या मोटारीची लांबी पाच फूट व रुंदी चार फूट आहे. चेसी मेटल तर बॉडी फायबरची आहे. बेळगावातून चेसी व आंध्र प्रदेशमधून बाॅडी बनवून आणून जोडली आहे. बुलेट, दुचाकीची चाके, जिपचे गिअर, इलेक्ट्रीक रिक्षाचे ब्रेक व १.३ अश्वशक्ती क्षमतेच्या पाच बॅटरींचा उपयोग मोटारीत केला आहे.

३० रुपयांत १०० किमी प्रवास

पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला चाट लागते. मात्र, ३० रुपये खर्चात पाच तास चार्जिंग केल्यास ही मोटार १०० किलोमीटर धावते. पर्यावरणपूरक व वापरण्यासाठी सुरक्षित अशा मोटारीत दोघांना बसता येते.

हेही वाचा: कोल्हापूर : मराठा मुक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

"सतत काहीतरी नवीन बनविण्याचा छंद आहे. त्यातूनच पर्यावरणपूरक व महागड्या पेट्रोलला पर्याय म्हणून बॅटरीवर चालणारी कार बनविली. प्रयोग यशस्वी झाल्याने उत्साह वाढला आहे. यापुढेही सामान्यांना परवडण्याच्या अनुषंगाने मोटारीत बदल करणार आहोत."

- प्रसन्ना केस्ती, इलेक्ट्रीक अभियंता, संकेश्वर

loading image