इको फ्रेंडली चप्पल अन्‌ वेडिंग डेकोरेशनही!

इको फ्रेंडली चप्पल अन्‌ वेडिंग डेकोरेशनही!

कोल्हापूर - परंपरा जपताना येथील तरूणाईने आता नवसंकल्पना पुढे आणल्या असून त्या हळूहळू लोकप्रिय होवू लागल्या आहेत. इकोफ्रेंडली बॉलपेन, फ्रूट बकेटनंतर येथील युवा कलाकार चिदंबर शिंदे याने आता इकोफ्रेंडली कागदाच्या चपलाचा प्रयोग सुरू केला असून तो लवकरच यशस्वी होईल, असा त्याचा दावा आहे. त्याशिवाय युनाते क्रिएशन्स या टीमनं विवाह समारंभात इकोफ्रेंडली वेडिंग डेकोरेशन ही संकल्पना पुढे आणली आहे. 

चिदंबर शिंदेच्या इकोफ्रेंडली बॉलपेनचा गेली पाच-सहा महिने चांगलाच बोलबाला झाला. या पेनमधील रिफीलही कामदापासून तयार करता येते का, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असून कागदी चपलाचा प्रयोगही सुरू आहे. लवकरच हा प्रयोग यशस्वी होणार असून त्याच्या पेटेंटसाठी तो प्रयत्न करणार आहे. 
युनाते क्रिएशन्सची इकोफ्रेंडली वेडिंग डेकोरेशनची धूमही यंदाच्या लग्नसराईत चांगलीच चर्चेत आहे. 

सह्याद्रीच्या खोऱ्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, मोखाडा आदी अनेक आदिवासी संस्कृतीतून निर्माण झालेल्या ‘वारली’ या कलाप्रकाराचा या डेकोरेशनसाठी प्रभावीपणे वापर केला जातो आहे. प्रवेश करताना अगदी रांगोळीपासून ते मुख्य मंडपातील व्यासपीठापर्यंत आणि जेवण व्यवस्थेच्या हॉलपर्यंत सर्व सजावट इकोफ्रेडली करण्यावर या टीमने भर दिला आहे. त्यासाठी कागद, विविधरंगी कापडांसह पाना-फुलांचा वापर केला जातो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com